ह्युस्टन : टेक्सासमधील अल्पसंख्याक मतदारांना भावनिक साद घालत ‘श्री गणेश’च्या प्रतिमेचा वापर करून वृत्तपत्रात दिलेल्या जाहिरातीमुळे अमेरिकेतील सत्तारूढ रिपब्लिकन पार्टीला हिंदू समुदायाची माफी मागावी लागली. गणेशोत्सवाचे औचित्य साधून रिपब्लिकन पार्टीने जाहिरातीत श्री गणेशाच्या चित्राचा वापर केला. त्यात मतदारांना भावनिक आवाहन करणारा मजकूरही आहे. ‘हत्तीची पूजा कराल की गाढवाची? तुम्हीच ठरवा? या मजुकरासह प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात पाहून अमेरिकेतील भारतीय समुदायाने तीव्र आक्षेप घेतला.सर्वात जुन्या पक्षाची ही राजकीय जाहिरात हिंदू समुदायाच्या भावना, श्रद्धा आणि आस्थांचा अपमान करणारी आहे. यामुळे हिंदू समुदायाच्या भावना दुखावल्या आहेत, अशा शब्दात नाराजी व्यक्त केली.
अमेरिकेतील सत्ताधाऱ्यांकडून हिंदूंची माफी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 4:35 AM