हिरोशिमा : जपानमधील हिरोशिमा शहरावर अणुबॉम्ब टाकल्याला गुरुवारी ६ आॅगस्ट रोजी ७० वर्षे पूर्ण झाली असून, या हल्ल्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ हिरोशिमा येथील पीस मेमोरियल पार्कमध्ये आयोजित समारंभास पंतप्रधान शिंझो अॅबे व परदेशी नेते उपस्थित होते. सकाळी ८.१५ वाजता बेल वाजल्या व क्षणभराची स्तब्धता पाळून बॉम्बस्फोटातील बळींना श्रद्धांजली वाहण्यात आली. आज हिरोशिमा जीवनाने फुललेले आहे; पण ६ आॅगस्ट १९४५ रोजी हिरोशिमावर अत्यंत वाईट हल्ला झाला. अमेरिकेच्या बी-२९ बॉम्बर विमानाने लिटिल बॉय नावाचा अणुबॉम्ब हिरोशिमावर टाकला. या बॉम्बचा स्फोट होऊन ज्वाळा उसळल्या. जमीन ४ हजार अंश सेल्सिअसपर्यंत तापली. या स्फोटात १ लाख ४० हजार लोक मरण पावले. जे वाचले तेही नंतरच्या काळात किरणोत्साराने मृत्यू पावले. (वृत्तसंस्था)
हिरोशिमावरील हल्ल्याला ७० वर्षे
By admin | Published: August 06, 2015 10:38 PM