गिलगिट : बदलती जीवनशैली आणि ताणतणाव यामुळे माणसाचे आयुष्य कमी होत चालले आहे. खाण्यातील बदलामुळे रोगांचेही प्रमाण वाढले आहे, पण एक अशी जमात आहे जी या सर्व बाबींपासून दूर आहे. पाकव्याप्त काश्मिरातील गिलगिट आणि बाल्टिस्तान या डोंगरी भागात राहणारा हुंजा हा समुदाय दीर्घायुष्यासाठी ओळखला जातो. हिमालयाच्या डोंगररांगात राहणारा हा समुदाय भारताच्या उत्तर भागात राहतो. येथून पुढे भारत, पाकिस्तान, चीन, अफगाणिस्तानची सीमा जवळजवळ आहे. निसर्गाच्या सान्निध्यात राहणारे आणि निसर्गाशी मिळून मिसळून राहणारे हे लोक कॅन्सरसारख्या रोगांपासून कोसोदूर आहेत. चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद आणि संतुलित आहार यांच्या दीर्घायुष्याचे कारण सांगितले जाते. या समुदायाची लोकसंख्या ८७ हजार एवढी आहे. १९८४ मध्ये या समुदायाच्या एका व्यक्तीला लंडनमधील एअरपोर्टवर सेक्युरिटीने रोखले होते. त्याचे कारण असे सांगितले जाते की, या व्यक्तीने सांगितलेले वय आणि प्रत्यक्षात दिसणारे वय यात खूप फरक वाटत होता. हा व्यक्ती १९३२ चा जन्म सांगत होता, पण त्यापेक्षा तो खूप तरुण दिसत होता. येथील प्रत्येक व्यक्ती सुंदर, तरुण आणि आनंदी दिसते. खरेच जगण्यासाठी आणखी काय पाहिजे?
यांचे आयुष्यमान आहे दीडशे वर्षे
By admin | Published: May 16, 2017 1:39 AM