लंडन-भारतीय स्वातंत्र्यचळवळीत महत्त्वाच्या घडामोडीची साक्षीदार असणारी द इंडिया क्लबची इमारत जमिनदोस्त होणार नाही असे आश्वासन भारताला देण्यात आले आहे. वेस्टमिनिस्टर सिटी कौन्सीलने या जागी हॉटेल बांधण्यासाठी इमारत पाडण्यास परवानगी देणार नाही असे स्पष्ट केले आहे. या जागी मार्स्टन प्रॉपर्टीज ही इमारत एक अत्याधुनिक हॉटेल बांधण्याच्या विचारात होती.हा क्लब पाडला जाऊ नये असा वेस्टमिनिस्टर सिटी कौन्सीलमध्ये एकमताने निर्णय घेण्यात आला. इंडिया क्लब ही एका सांस्कृतीक संस्था आहे. भारताशी तिचे ऐतिहासिक संबंध आहेत. मनोरंजन आणि सांस्कृतीक विविधतेसाठी या इमारतीचे मोठे योगदान आहे असे क्लबचे व्यवस्थापक फिरोजा मार्कर यांनी सांगितले. भारत-ब्रिटन यांच्यातील मैत्री आणि वेस्टमिनिस्टरमधील बहुरंगी संस्कृतीची ओळख म्हणून या इमारतीकडे पाहिले जाते. ही इमारत जपली जावी यासाठी आम्ही आमची मोहीम चालू ठेवू असेही मार्कर यावेळी म्हणाले.
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाचे केंद्र 'द इंडिया क्लब' जमिनदोस्त होणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2018 2:20 PM