बीजिंग : कार्बनचे सर्वाधिक उत्सजर्न करणा:या अमेरिका व चीनने पुढील दोन दशकांत त्यांचे कार्बन उत्सजर्न जवळपास एक तृतीयांश घटवू शकणा:या ऐतिहासिक कराराची बुधवारी घोषणा केली.
चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग व त्यांचे अमेरिकी समपदस्थ बराक ओबामा यांच्यात उभय देशांदरम्यानचे संबंध वृद्धिंगत करण्यासाठी झालेल्या चर्चेदरम्यान या कराराची घोषणा करण्यात आली. चीनमध्ये अपेक शिखर परिषदेच्या समारोपानंतर ओबामांनी राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्यासोबत हवामान बदलासंबंधीच्या कराराची घोषणा केली. या करारांतर्गत अमेरिका 2क्क्5 मध्ये निश्चित करण्यात आलेल्या पातळीवर 2क्25 र्पयत आपल्या कार्बन उत्सजर्नात 26 ते 28 टक्के कपात करेल. चीनचे कार्बन उत्सजर्न 2क्3क् र्पयत वाढेल. तो यासोबतच 2क्3क् र्पयत आपल्या बिगर जीवाश्म इंधनाचे प्रमाण 2क् टक्क्यांर्पयत वाढवेल. हा करार दोन्ही देशांच्या कार्बन उत्सजर्नाचे प्रमाण एक तृतीयांशर्पयत कमी करू शकतो.
ओबामांनी जिनपिंग यांच्यासोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले की, जगातील दोन मोठय़ा कार्बन उत्सजर्कांच्या नात्याने हवामान बदलाविरुद्धच्या जागतिक प्रयत्नांचे नेतृत्व करणो ही आमची विशेष जबाबदारी आहे. (वृत्तसंस्था)