जगभरात चर्चेचा विषय ठरलेल्या 'मी टू' प्रकरणानंतर आता हॉलिवूड अभिनेत्री एलिसा मिलानो हिने गर्भपातासंबंधी कायद्यांविरोधात आवाज उठवला आहे. एलिसाने यासाठी जगभरातील महिलांना 'सेक्स स्ट्राइक' करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा एलिना मिलानो आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आली आहे. एलिनाच्या या अभियानाला काही लोकांचं समर्थन मिळत आहे तर काही लोक यावर जोरदार टिका करत आहेत.
...तोपर्यंत शारीरिक संबंध टाळा
एलिसाने #MeToo या अभियानाला सुरूवात केली होती, त्यानंतर जगभरातील महिलांनी त्यांच्यावर झालेल्या अत्याचारांना जगासमोर मांडले होते. आता तिने गर्भपातासंबंधी वेगवेगळ्या आणि कठोर कायद्यांना विरोध करण्यास सांगितले असून या विरोधात एकत्र येण्याचे तिने महिलांना आवाहन केले आहे. कारण या कायद्यांमुळे महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तिने सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट लिहिली की, जोपर्यंत आपल्याला आपल्या शरीरावर पूर्णपणे अधिकार मिळत नाही, तोपर्यंत जोडादारासोबत शारीरिक संबंध ठेवू नका.
काय आहे प्रकरण?
अमेरिकेतील जॉर्जिया हे असं चौथं राज्य आहे जिथे गर्भपातावरील बंदीच्या नियमात बदल केले आहेत. आणि येथील हार्टबीट कायद्यानुसार, भ्रूणाच्या हृदयाचे ठोके ऐकू आल्यास महिला गर्भपात करू शकणार नाहीत. एका माहितीनुसार, भ्रूणाच्या हृदयाचे ठोके ६ आठवड्यात सामान्यपणे ऐकू येऊ लागतात. पण तोपर्यंत अनेक महिलांना त्या गर्भवती आहेत याची कल्पनाही नसेत. त्यामुळे यावरून सध्या जोरदार वाद सुरू आहे.
काय म्हणाली एलिना?
ट्विट करून एलिना म्हणाली की, 'आपण हे समजून घ्यायला हवं की, देशातील स्थिती किती गंभीर आहे. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की, आपल्या शरीरावर आपला अधिकार आहे आणि हे आपण ठरवलं पाहिजे की, याचा वापर कसा करायचा. आपण प्रेम करतो आणि शरीराच्या स्वातंत्र्यांसाठी संघर्ष देखील करू शकतो. पुरूषांच्या बरोबरीसाठी आणखीही काही पर्याय आहेत. आपल्या योनीची रक्षा करा. सत्तेवर बसलेले लोक तुमच्या योनीवरही नियंत्रण मिळण्याचा प्रयत्न करत आहेत'.