इटलीमध्ये फक्त एक युरोमध्ये (७२ रुपये) घर मिळते यावर तुमचा विश्वास बसणारच नाही. परंतु हे सत्य आहे. इटलीच्या गांगी, सिसिली, करेगा लिगर, पिडमाँट आणि लेक नी मार्सी भागात फक्त एक युरोत घर विकले जात आहे तरीही ते घ्यायला कोणीही तयार नाही कारण या भागांत भूतखेत आहेत, असे मानले जाते. शिवाय ही जागा वाईट/अशुभही समजली जाते.या शहरांची ओळख भुताखेतांची शहरे अशी बनली आहे. या गावांत राहिल्यावर रोजगार मिळत नाही, असे बोलले जाते. येथे राहणाऱ्या अनेकांचे अपहरण केले गेले त्यामुळे भीतीतून लोक येथे राहण्याला पसंती देत नाहीत. पर्यायाने घर मालकांवर अत्यंत आकर्षक किमतीत ते विकायची वेळ आली आहे. त्यात एक अट अशी की या घराची डागडुजी, नूतनीकरण या कामावर जवळपास १८ लाख खर्च करावे लागतील. ही घरे खूप जुनाट असून त्यांच्या दुरुस्तीची खूप गरज आहे.
इटलीत फक्त ७२ रुपयांत घर
By admin | Published: April 17, 2017 1:40 AM