काबूल : अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर तालिबानींनी अखेर नवीन काळजीवाहू सरकारची घोषणा केली. पंतप्रधान म्हणून मुल्ला हसन अखुंद यांचे नाव घोषित केले तर मुल्ला अब्दुल गनी बरदार यांना त्यांचे कनिष्ठ बनवले आहे. विशेष म्हणजे अमेरिकेने मोस्ट वॉन्टेड दहशतवादी जाहीर केलेला सिराजुद्दीन हक्कानी याला या सरकारमध्ये गृहमंत्री बनवण्यात आले आहे. अमेरिकेने हक्कानी याच्यावर ५ दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस जाहीर केलेले असून तालिबानने त्याला नव्या सरकारमध्ये महत्त्वाची जबाबदारी दिली आहे.दहशतवादी संघटना हक्कानी नेटवर्कचा मास्टरमाइंड सिराजुद्दीन हक्कानीचे पाकिस्तानची गुप्तचर संस्था इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्सशी (आयएसआय) संबंध आहेत. त्याला आयएसआयचा प्रॉक्सीदेखील म्हटले जाते. अलीकडेच, आयएसआयचे मुख्य महासंचालक लेफ्टनंट जनरल फैज हमीद अफगाणिस्तानला गेले होते आणि काबूलमधील सेरेना हॉटेलमध्ये थांबले होते. या भेटीनंतर पाकिस्तानला तालिबान सरकारमध्ये आपले स्थान मजबूत करायचे आहे, असे मानले जात होते.सिराजुद्दीन हक्कानी २००८ मध्ये अफगाणिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई यांच्या हत्येच्या प्रयत्नांच्या नियोजनात सहभागी असल्याचे म्हटले जाते.
तालिबानच्या उद्यापासून आतापर्यंत म्हणजे गेल्या ४० एक वर्षांत पाकिस्ताननेच तालिबानला पोसले, मदत केली, मोठे केले. अमेरिका अफगाणिस्तानमधून निघून गेल्यामुळे जी पोकळी निर्माण झालीय, ती जागा हडपण्यासाठीही चीनने तातडीने पावले उचलली. तालिबानचे नेते आधीपासूनच चीनचा सरकारी दौरे करत आलेले आहेत. रशियाने तालिबानशी आधीच चर्चा सुरू केली होती. त्यालाच मॉस्को फॉरमॅट असे म्हटले गेले. इराण आणि अफगाणिस्तानमध्ये शिया आणि सुन्नी असा गंभीर प्रश्न आहे. तरीही अफगाणिस्तानने इराणला निमंत्रण दिले त्याचे कारण इराणचे धोरण. इस्लामच्या नावावर तुर्कीनं सध्या अनेक मुस्लीमबहुल देशांचे नेतृत्व करण्याचा प्रयत्न चालवलाय. त्याच कारणामुळे तो भारताविरोधात पाकिस्तानला मदत करतोय. तालिबान पुन्हा अफगाणिस्तानमध्ये सत्तेवर आला त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे कतारने पार पाडलेली भूमिका. तालिबानचे राजकीय कार्यालय कतारमध्ये उघडले गेले.
कोणतीही मास्टर डिग्री काही कामाची नसल्याचे शिक्षणमंत्र्यांचे म्हणणे...
nअफगाणिस्तानचे नवे शिक्षणमंत्री शेख मौलवी नूरल्लाह मुनीर यांनी आजच्या काळात पीएच.डी. किंवा अन्य कोणतीही मास्टर डिग्री काही कामाची नाही, असे वक्तव्य करत खळबळ उडवून दिली आहे.nमंत्री शेख मौलवी यांचे म्हणणे असे की, आज देशात मुल्ला आणि तालिबानचे सरकार आहे. आमच्यापैकी कोणाकडेही कोणतीही डिग्री नाही तरी आम्ही महान आहोत.
nतालिबान सरकारच्या स्थापना समारंभास तालिबानने फक्त ६ देशांनाच निमंत्रण दिल्याचे वृत्त आहे. हे देश पाकिस्तान, चीन, रशिया, इराण, कतार आणि तुर्की आहेत. भारत किंवा अमेरिकेला निमंत्रण नाही. त्याला काही ऐतिहासिक कारणे आहेत.