बीजिंग : भारतीयांना हाँगकाँगमध्ये तिथे पोहाचल्यावर दिल्या जाणाऱ्या व्हिसाची (आॅन अरायव्हल व्हिसा) सवलत आता काढून घेण्यात आली आहे. यापुढे भारतात हाँगकाँगचा आधी व्हिसा मिळवावा लागेल आणि तो मिळाल्यानंतरच तिथे जाता येईल. दरवर्षी भारतातून लाखो लोक हाँगकाँगला पर्यटनासाठी जातात. त्यांना विमानतळावर पोहोचल्यावर व्हिसा दिला जातो. तो आता दिला जाणार नाही. त्यामुळे आधीच व्हिसा काढून ठेवावा लागेल. हाँगकाँगचा आॅनलाइन व्हिसा भारतात सोमवार २३ जानेवारीपासूनच दिला जाणार आहे. ज्या भारतीयांना हाँगकाँगमध्ये राहायचे आहे वा त्यांना अन्य ठिकाणच्या प्रवासात हाँगकाँगमध्ये थांबावे लागणार आहे, त्यांच्याकडे आधीच व्हिसा तयार असणे गरजेचे आहे. मात्र प्रवासाच्या दरम्यान ज्यांना हाँगकाँग विमानतळाबाहेर जावे लागणार नाही, अशांना व्हिसा लागणार नाही.भारतीय वाणिज्य दुतावासाला पाठवलेल्या पत्रात हाँगकाँग प्रशासनाने म्हटले आहे की, काही ठराविक वर्गातील भारतीय वगळता अन्य कोणालाही केवळ पासपोर्टच्या आधारे हाँगकाँगमध्ये प्रवेश मिळणार नाही. (वृत्तसंस्था)
हाँगकाँगने काढली भारतीयांची व्हिसा सवलत
By admin | Published: January 22, 2017 12:37 AM