इस्लामाबाद : भारत व पाकिस्तान यांच्यातील बोलणी प्रक्रिया पुन्हा सुरू होऊ शकेल, असा विश्वास पाकच्या अधिकाऱ्यांना वाटतो आहे. भारताचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांच्या ३ मार्च रोजी होणाऱ्या दौऱ्यात पाकिस्तान नव्याने विश्वास निर्माण करणाऱ्या गोष्टींसाठी पुढाकार घेईल, या वार्ता केवळ कयास असल्याचे या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.जयशंकर यांनी रविवारपासून आपल्या सार्क दौऱ्याला भूतानपासून सुरुवात केली व सोमवारी बांगलादेशला गेले. मंगळवारी ते ढाक्याहून इस्लामाबादला जातील. तेथे ते पाकचे परराष्ट्र सचिव एजाज अहमद चौधरी व पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट घेतील. जयशंकर यांचा हा दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य दौरा असल्याचे आम्हाला माहिती आहे; परंतु जेव्हा परराष्ट्र सचिव भेटतील तेव्हा द्विपक्षीय संबंधांवर चर्चा होईल. (वृत्तसंस्था)
भारत-पाकमध्ये चर्चेची प्रक्रिया सुरू होण्याची आशा
By admin | Published: March 03, 2015 12:53 AM