शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
3
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
4
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
5
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
6
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
7
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
9
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
10
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
11
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
12
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
13
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
14
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
16
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
17
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
18
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
19
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
20
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!

व्हाईट हाऊसच्या संपर्क संचालक होप हिक्सची राजीनाम्याची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2018 5:59 AM

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सहयोगी होप हिक्स यांनी व्हाईट हाऊसच्या संपर्क संचालकपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे.

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सहयोगी होप हिक्स यांनी व्हाईट हाऊसच्या संपर्क संचालकपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. होप (२९) यांनी गत तीन वर्षात विविध क्षेत्रात काम केले आहे. ट्रम्प यांच्या प्रचार मोहिमेच्या प्रवक्त्या आणि २० जानेवारी २०१७ पासून त्या संपर्क संचालक म्हणून कार्यरत आहेत.२०१६ मध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रशियाच्या हस्तक्षेपाच्या आरोपात ‘हाऊस इंटेलिजेंस कमेटी’च्या समोर हजर झाल्यानंतर एक दिवसानंतरच त्यांनी राजीनाम्याची घोषणा केली आहे, हे विशेष. अर्थात, त्यांच्या राजीनाम्याची तारीख व्हाईट हाऊसकडून सांगण्यात आली नाही. पण, असे स्पष्ट करण्यात आले आहे की, आगामी काही आठवड्यात त्या या पदावरुन जाणार हे निश्चित आहे.होप या दीर्घकाळापासून ट्रम्प यांच्यासोबत काम करत आहेत. निवडणुकीच्या काळात आणि नंतरही त्या ट्रम्प यांच्यासोबत कार्यरत आहेत. ट्रम्प यांच्याशी संपर्क करुन राजीनामा देणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. याबाबत ट्रम्प यांनी म्हटले आहे की, होप एक व्यक्ती म्हणून चांगल्या आहेत. गत तीन वर्षात त्यांनी उत्कृष्ट कार्य केले आहे. त्या अतिशय बुद्धिमान आहेत. (वृत्तसंस्था)>व्हाईट हाऊसला धक्काडोनाल्ड ट्रम्प यांच्या विश्वासार्ह सहकारी म्हणून ज्यांची ओळख आहे त्या होप हिक्स यांच्या राजीनाम्याच्या घोषणेमुळे व्हाईट हाऊस आणि ट्रम्प यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.माजी मॉडल ते ट्रम्प यांच्या प्रचार मोहिमेतील एक प्रमुख अशा विविध क्षेत्रात संचार करुन त्या सध्या संपर्क संचालक हे महत्वाचे पद सांभाळत होत्या.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्प