आफ्रिकेतील देश कांगो देशात मंगळवारी रात्री प्रवाशांना घेऊन जाणारी बोट नदीत उलटली. या दुर्घटनेत ५० जणांचा मृत्यू झाला आहे. तर, जवळपास १०० लोक बेपत्ता झाले आहेत. पोलिसांकडून बेपत्ता झालेल्या लोकांना शोध घेतला जात आहे. या दुर्घटनेतून वाचलेल्या लोकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, एचबी कोंगोलो नावाची बोट माटनकुमु बंदरातून बोलोम्बा क्षेत्रासाठी निघाली होती. परंतु, म्बांडाका शहराजवळ अचानक बोटीला आग लागली. एक महिला जेवण बनवत असताना आग लागल्याचे सांगण्यात आले. आगीपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी अनेकांनी नदीत उड्या घेतल्या. या दुर्घटनेत ५० जणांचा मृत्यू झाला आहे. तर, जवळपास १०० लोक बेपत्ता झाले असून त्यांचा शोध सुरू आहे. दरम्यान, आगीत होरपळून जखमी झालेल्या आणि दुर्घटनेतून बचावलेल्या लोकांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे.
बेपत्ता लोकांचा शोध सुरूकॉम्पेटेंट लोयोको यांनी 'असोसिएटेड प्रेस' या वृत्तसंस्थेला सांगितले की, या दुर्घटनेत वाचलेल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. तर, जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जवळपास १०० लोक अजूनही बेपत्ता आहेत. अद्यापही त्यांचा ठावठिकाणा कळलेला नसून शोध मोहीम राबवली जात आहे.
बोट अपघाताचे प्रमाण वाढलेकांगोमधील रस्त्यांची अवस्था बिकट आहे, ज्यामुळे लोक नद्यांमधून लाकडी बोटींनी प्रवास करतात. या बोटी बर्याचदा जास्त प्रमाणात भरल्या जातात, ज्यामुळे अपघातांचा धोका वाढतो. गेल्या काही वर्षांत अशा अनेक अपघातांमध्ये शेकडो लोकांचा जीव गमावला आहे. डिसेंबरमध्ये ३८ लोक उत्तर-पूर्व कांगोमध्ये ख्रिसमससाठी प्रवास करीत असताना बोट अपघातात ठार झाले. तर, ऑक्टोबरमध्ये किवू लेक येथे दुसर्या अपघातात ७८ लोकांचा मृत्यू झाला.