अपघात किंवा कुठल्यातरी दुर्घटनेच्या प्रकरणार कोर्टाकडून जबाबदार व्यक्तीला नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले जातात. मात्र केवळ अंगावर कॉफी सांडणे ही मोठी दुर्घटना ठरू शकेल का? डोनट आणि कॉफी ब्रँड डंकिनच्या एका आऊटलेटच्या मालकासाठी मात्र एका महिलेवर कॉफी सांडणं ही मोठी चूक ठरली आहे.
त्याचं झालं असं की, सन २०२१ जॉर्जियामधील एका महिलेला या रेस्टॉरंटमध्ये कॉफी देत असताना कर्मचाऱ्याच्या हातातून कप पडला आणि गरम कॉफी त्याच्यावर पडली. मात्र ही खूप मोठी चूक असेल असं कुणाला वाटलं नाही. मात्र कॉफी अंगावर सांडल्याने महिलेची त्वचा भाजली. त्यानंतर प्रकरण कोर्टात पोहोचले. तिथे मॉर्गन अँड मॉर्गन या लॉ फर्मच्या बेंजामिन वेच यांनी सांगितले की, ७० वर्षांच्या महिलेला यामुळे गंभीर दुखापत झाली. तिला पुन्हा चालणं शिकावं लागलं. आजही तिला दैनंदिन काम करण्यात अडचणी येत आहेत.
बेजामिन यांनी सांगितले की, हा आऊटलेट चालत राहील. मात्र आमच्या अशिलाला पुन्हा चालणं शिकावं लागत आहे. त्यांना झालेल्या जखमा एवढ्या खोल होत्या की, त्यांना अनेक आठवडे रुग्णालयातील बर्न युनिटमध्ये राहावे लागले. त्यांचं जीवन पूर्णपणे बदलून गेलं आहे. त्यांना चालताना आजही त्रास होतो. त्या उन्हात जाऊ शकत नाहीत.
ही महिला जॉर्जियाच्या शुगर हिल, डंकिन आऊटलेटमध्ये गेली होती. तिने एक कप गरम कॉफीची ऑर्डर दिली. कर्मचाऱ्यांनी त्यांना कॉफी दिल्यानंतर त्या कपचं झाकण उघडं असल्याचं दिसून आलं. या उघड्या कपमधील कॉफी महिलेच्या शरीरावर पडली. त्यामुळे त्यांना भाजून जखमा झाल्या.
या जखमांवरील उपचारांसाठी त्यांना तब्बल २००,००० डॉलर (१.६६ कोटी रुपये) खर्च झाला. खटल्यावरील सुनावणीवेळी सांगितले की, जर कर्मचाऱ्याने कॉफीचा कप व्यवस्थित लावला असता तर ही दुर्घटना घडली नसती. मंगळवारी डंकिश लोकेशनचं संचालन करणारी फ्रँचायझी, गोल्डन डोनट्स, एलएलसी, महिलेला झालेल्या दुखापतींची भरपाई म्हणून ३ दशलक्ष डॉलर (२४.९५ कोटी रुपये) देण्याच्या तडजोडीस तयार झाले.