टोकियो : जपानच्या या रेल्वेचे नाव आहे एससी मॅग्लेव. ताशी ६०० कि.मी. वेगाने धावणारी हे रेल्वे डोळ्यांची पापणी लवते न लवते तोच समोरून निघून जाते. सर्वात वेगाने धावण्याचे वर्ल्ड रेकॉर्ड या रेल्वेच्या नावावर आहे. २०१५ मध्ये या रेल्वेने ६०३ कि.मी.चे अंतर एका तासात कापत नवा विक्रम केला होता. त्यावेळी ही रेल्वे ११ सेकंदांत १.८ कि.मी.चे अंतर कापत होती. ही रेल्वे मॅग्नेटिक सिस्टीमवर आधारित आहे. अशा प्रोजेक्टसाठी खर्चही खूप येतो. मॅग्नेटिक लेविएटेशनमध्ये (चुंंबकीय उत्क्रांती) रेल्वे रूळ आणि चाके यात चुंबकीय दबाव असतो. जेव्हा रेल्वे धावत असते तेव्हा ती रुळाच्या १ ते ६ इंच वरून जात असते. अगदी वेगात असणाऱ्या या रेल्वेला जवळून कॅमेऱ्यात टिपणेही अवघड आहे.
ताशी ६०० कि.मी. वेगाने धावणारी रेल्वे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2017 7:26 AM