वॉशिंग्टनः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग प्रक्रियेच्या प्रस्तावास प्रतिनिधी सभेत मंजुरी देण्यात आली आहे. हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये मतदान घेतलं असता 230 विरुद्ध 197 मतांनी हा प्रस्ताव पारीत करण्यात आला. प्रतिनिधी सभेत जास्त करून सदस्यांनी ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग कारवाई करण्याच्या बाजूनं मतदान केलं. तत्पूर्वी ट्रम्प यांनी प्रतिनिधी सभेतील स्पीकर नॅन्सी पेलोसी यांना एक पत्र लिहून महाभियोग प्रक्रिया थांबवण्याची विनंती केली होती. महाभियोग या कारवाईच्या माध्यमातून डेमोक्रेटचे सिनेटर शक्तीचा दुरुपयोग करत असून, हे असंवैधानिक असल्याचं ट्रम्प म्हणाले आहेत. अमेरिकेच्या इतिहासात असं जवळपास अनेक वर्षांनी होत आहे. डेमोक्रेट्स नेते नॅन्सी पेलोसी यांच्या मते, ट्रम्प यांनी अमेरिकेच्या संविधानाचा घोर अपमान केला आहे. कोणीही कायद्याहून श्रेष्ठ नसल्याचंही नॅन्सी म्हणाल्या होत्या. ट्रम्प यांनी यूक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी सैन्य कारवाईची धमकी दिली होती. तसेच त्यांनी दबाव टाकत माजी उपराष्ट्राध्यक्ष बाइडन आणि त्यांचा मुलगा हंटर याच्याविरोधात भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना आदेश दिले होते. परंतु अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर चालणार महाभियोग
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 7:46 AM