बंगलादेशमध्ये शेख हसिना यांच्या नेतृत्वाखालील सरकार उलथवून लावण्यात आल्याच्या घटनेला आता दोन महिने होत आहेत. आरक्षणाविरोधातील विद्यार्थी आंदोलनाची परिणती शेख हसिना यांचं सरकार जाण्यामध्ये झाली होती. दरम्यान, हे सत्तांतर झाल्यापासून या सत्तांतरामागे कोण असेल, याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. तसेच या सर्वांमागे अमेरिका असल्याचाही दावा केला जात होता. दरम्यान, काही गोपनीय रिपर्टमधून सत्तांतराबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. तसेच या सत्तांतरासाठी काही दिवसांपासून नव्हे तर बऱ्याच काळापासून प्रयत्न सुरू होते, असे समोर आले आहे. एवढंच नाही तर यासाठी एक काही खास लोकांना कामाला लावण्यात आले होते. हा रिपोर्ट प्रख्यात लेखिका तस्लिमा नसरिन यांनी शेअर केला आहे.
आंतरराष्ट्रीय संबंधांवर काम करणारी अमेरिकन संस्था ग्रेझोनने अमेरिकन परराष्ट्र विभाच्या लिक झालेल्या कागदपत्रांमधून अनेक सनसनाटी गौप्यफोट झाले आहेत. या रिपोर्टनुसार अमेरिकन परराष्ट्र विभागाने इंटरनॅशनल रिपब्लिकन इन्स्टिट्युटकडे (आयआरआय) शेख हसिनांचं सरकार पाडण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. या संस्थेने शेख हसिनांचं सरकार पाडण्यासाठी कशाप्रकारे लाखो डॉलर्स खर्च करण्यात आले, याचा उल्लेख या कागदपत्रांमध्ये आहे. तसेच बांगलादेशमधील विरोधा पक्षांनाही मोठ्या प्रमाणात पैसे देण्यात आले.
या रिपोर्टमधील आणखी उल्लेखांनुसार शेख हसिना यांना सत्तेतून बाहेर करण्याची योजना २०१८ मध्येच आखण्यात आली होती. तेव्हा एका बसचालकाने दोन विद्यार्थ्यांच्या केलेल्या हत्येविरोधात आंदोलनं झाली होती. तसेच आंदोलनाच्या माध्यमातून सरकार पाडता येईल, याची कल्पना अमेरिकेला आली. त्यानंतर वारंवार आंदोलनं होऊ लागली. सरकारने आंदोलक विद्यार्थ्यांवर सक्ती केली की विरोधी पक्षांना चाळवले जात असे. त्यामधून सरकारविरोधात लोकांचा संताप वाढला. शेवटी त्याची परिणती म्हणून ४ ऑगस्ट रोजी शेख हसिना यांना सत्ता सोडून आणि देश सोडून जावं लागलं.