प्रश्न- मी अमेरिकेचा नागरिक असून भारतात वास्तव्यास आहे. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीत मी कसं मतदान करू शकतो?उत्तर- सर्वप्रथम मतदानासाठी नोंदणी करा. तुमची राज्यातील नोंदणी सर्वप्रथम पडताळून पाहा. गैरहजर मतदारांनी वार्षिक नोंद करावी, असा काही राज्यांचा नियम आहे. त्यामुळे पुनर्नोंदणी आवश्यक असते. त्यासाठी FVAP.gov वर जा आणि तुम्ही ज्या राज्यात मतदानाचा हक्क बजावता, त्यावर जाऊन बॅलेट किंवा अन्य गोष्टींसाठी विनंती करा.यानंतर बॅलेटसाठी विनंती करा. बहुतांश राज्यं त्यांच्या निवडणूक संकेतस्थळावरून बॅलेटसाठी विनंती करण्याचा पर्याय उपलब्ध करून देतात. FVAP.gov च्या माध्यमातून तुम्हाला हा पर्याय सहज उपलब्ध होईल. तुम्ही फेडरल पोस्ट कार्ड ऍप्लिकेशन भरण्याचा पर्यायदेखील निवडू शकता. यामुळे तुम्ही फेडरल ऑफिसच्या सर्व निवडणुकांमध्ये मतदान करू शकता. यामध्ये वर्षभरात होणाऱ्या प्राथमिक आणि विशेष निवडणुकांचा समावेश असतो. स्वाक्षरी, दिनांक असलेले, व्यवस्थित भरलेले एफपीसीए अर्ज अमेरिकेच्या प्रत्येक राज्यातल्या सर्व स्थानिक निवडणूक अधिकाऱ्यांकडून स्वीकारले जातात. इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं तुमचं बॅलट उपलब्ध करून झाल्यावर त्याची निवड करा. तुमच्या राज्यानं अर्ज भरण्यासाठी दिलेल्या मुदतीचं पालन करा. तुम्हाला बॅलट मिळाल्यावर ते पूर्ण भरा. राज्य फेडरल ऑफिसच्या निवडणुकीच्या ४५ दिवस आधी मतदारांना बॅलट्स पाठवतात. त्यांना प्राथमिक निवडणुकीच्या ३० दिवस आधी ही बॅलट्स जमा करायची असतात. बहुतांश राज्य तुम्हाला बॅलेट मिळालं की नाही, याची ऑनलाईन खात्री करून घेतात.तुम्ही भरलेलं बॅलट परत पाठवा. काही राज्यं तुम्हाला भरलेले बॅलट इलेक्ट्रॉनिक माध्यमातून परत करण्याची परवानगी देतात. तुमच्या राज्याला मतदानपत्र किंवा बॅलट कागदी स्वरुपात हवं असल्यास तुम्ही आंतरराष्ट्रीय मेल किंवा कुरियर सेवेचा आधार घेऊ शकता. तुम्ही पोस्टल पेड रिटर्न एन्वलपच्या माध्यमातून बॅलट पाठवू शकता. तुम्ही पाठवलेलं बॅलट अमेरिकेतल्या स्थानिक निवडणूक प्रशासनापर्यंत पोहोचेल याची काळजी घ्या. त्यासाठी बॅलट पेपर वेळेत पाठवा.निवडणुकीतील उमेदवार आणि विषय यांची माहिती मिळवण्यासाठी एफव्हीएपी लिंक पेज मदत करू शकतं. उमेदवारांची माहिती, त्यांना आधीच्या निवडणुकीत झालेल्या मतदानाचा तपशील, विविध विषयांवरील त्यांची भूमिका ऑनलाईन उपलब्ध आहे. निवडणुकीच्या तारखा आणि डेडलाईन्स याबद्दलच्या माहितीसाठी एफव्हीएपीच्या व्होटिंग अलर्ट्सना सबस्क्राईब (vote@fvap.gov) करा. यासोबतच फेसबुक (@DODFVAP), ट्विटर (@FVAP) आणि इन्स्टाग्राम (@fvapgov) या माध्यमातून एफव्हीएपी अलर्ट देते.निवडणुकीतील मतदानाशी संबंधित तुमचे प्रश्न असल्यास अमेरिकेच्या मुंबईतील दूतावाताशी MumbaiACS@state.gov वर संपर्क साधा.
भारतातील अमेरिकन नागरिक नोव्हेंबरमधील अध्यक्षीय निवडणुकीत कसं मतदान करू शकतात?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2020 5:06 PM