शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

अवकाशात किती कृष्णविवरं? शास्त्रज्ञांनी लावला शोध, संख्या वाचून बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 7:53 PM

पण, संशोधकांनी त्यांच्या नवीन संगणकीय पद्धतीने ही जिज्ञासू गणना केली आहे. इतकंच नाही तर तारकीय वस्तुमान असलेल्या कृष्णविवरात विश्वाचा किती भाग भरलेला आहे हेही त्यांनी शोधून काढलं आहे.

ज्याप्रमाणे पृथ्वीच्या पोटात जगाच्या निर्मितीची अनेक रहस्य दडलेली आहेत, त्याचप्रमाणं अवकाशामध्येही (Space Secret) अनेक गुपितं दडलेली आहेत. अंतराळ संशोधक (Space researcher) अवकाशातील ही गुपितं शोधून काढण्याचं काम करत असतात. अशा गुपितांमध्ये ब्लॅक होलचादेखील (Black Hole) समावेश होतो. ब्लॅक होल म्हणजेच कृष्णविवर ही संकल्पना साधरण १०० वर्षांपूर्वी समोर आली.

१९७२ मध्ये पहिल्या ब्लॅक होलचा शोध लागला. तीन वर्षांपूर्वी ब्लॅक होलचा पहिला फोटो काढण्यात यश आलं. एकूणच ब्लॅक होलबाबत सातत्यानं संशोधन सुरूच आहे. परंतु, विश्वात असलेल्या तारकीय वस्तुमानाच्या ब्लॅक होलची (Stellar Mass Black Holes) संख्या मोजण्याचा विचार कुणाच्या तरी डोक्यात येईल, याची कदाचित आपण कल्पानाही केली नसेल. पण, संशोधकांनी त्यांच्या नवीन संगणकीय पद्धतीने ही जिज्ञासू गणना केली आहे. इतकंच नाही तर तारकीय वस्तुमान असलेल्या कृष्णविवरात विश्वाचा किती भाग भरलेला आहे हेही त्यांनी शोधून काढलं आहे.

नवीन पद्धतींचा वापर करून, इंटरनॅशनल स्कूल फॉर ॲडव्हान्स्ड स्टडीजमधील (SISSA) संशोधकांनी आधुनिक खगोल भौतिकशास्त्र (Astrophysics) आणि खगोलशास्त्रातील (Astronomy) एका अतिशय महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. SISSAमधील प्रोफेसर अॅड्रिया लॅप्पी आणि डॉ. लुमेन बोको यांच्या मार्गदर्शनाखाली, पीएचडीचे विद्यार्थी अॅलेक्स सिसिलिया यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांमधील संशोधकांसोबत या विषयाचा अभ्यास केला.

अॅस्ट्रोफिजिकल जर्नलमध्ये (Astrophysical Journal) प्रकाशित झालेल्या अभ्यासात, संशोधकांनी तारकीय-वस्तुमान असलेल्या कृष्णविवरांच्या संख्येचा अभ्यास केला. महाकाय ताऱ्यांच्या मृत्युमुळे निर्माण झालेल्या तारकीय-वस्तुमान असलेल्या कृष्णविवरांचं वजन 'शेकडो सौर भार' असतं. सिसिलिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, अशा प्रकारचा अभ्यास करण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे.

सिसिलिया यांनी सांगितले की, त्यांच्या संशोधनामध्ये त्यांनी तारकीय आणि द्वीज विकासाचं एक तपशीलवार मॉडेल तयार केलं आहे. यामध्ये आकाशगंगेच्या (Galaxy) आत ताऱ्याची निर्मिती आणि धातू संवर्धनासारख्या प्रक्रियांचाही समावेश केला गेला आहे. खगोलशास्त्राच्या (Astronomy) इतिहासात प्रथमच अशा तारकीय वस्तुमानाच्या ब्लॅक होलचा अभ्यास करण्यात आला आहे.

तारकीय वस्तुमानाचे किती ब्लॅक होल आहेत?संशोधकांनी आपल्या अभ्यासादरम्यान, विश्वातील एकूण सामान्य पदार्थांपैकी एक टक्का पदार्थ या तारकीय-वस्तुमान असलेल्या कृष्णविवरांमध्ये कैद असल्याचं शोधून काढलं आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे संशोधकांना असं आढळलं की, आतापर्यंत निरीक्षण केलेल्या विश्वात म्हणजेच माणसाला ज्ञात असलेल्या अवकाशात अशा ब्लॅक होलची संख्या सुमारे ४० अब्ज आहे.

मोजणीसाठी कोणती पद्धत वापरलीशास्त्रज्ञांना अद्याप संपूर्ण विश्वाचा बराचसा भाग अज्ञात आहे. परंतु आतापर्यंत निरीक्षण केलेल्या विश्वाच्या आकारमानाचा विचार केल्यास त्याचा व्यास ९० अब्ज प्रकाश-वर्षांचा आहे. संशोधकांनी या अभ्यासात, तारकीय आणि द्वीज मूळ कोड SEVN या दोन मूळ पद्धतींना एकत्र करून एक परिमाण तयार केलं आहे. त्याचा वापर करूनच ब्लॅक होलची गणना करण्यात आली. SISSAमधील संशोधक डॉ. मारिओ स्पेरा यांनी SEVN विकसित केलं आहे.

घेतली महत्त्वाच्या घटकांची मदतSEVNचा वापर करून ताऱ्यांच्या निर्मितीचा वेग, ताऱ्यांच्या वस्तुमानाचं प्रमाण, आंतरतारकीय माध्यमाची धात्विकता आणि आकाशगंगेचे भौतिक गुणधर्म शोधले गेले. तारकीय कृष्णविवरांची संख्या आणि वस्तुमान ठरवण्यासाठी हे सर्व महत्त्वाचे घटक आहेत. हे घटक शोधूनच संशोधकांना विश्वाच्या इतिहासात अशा कृष्णविवरांची संख्या आणि त्यांच्या वस्तुमानाचं वितरण सापडलं आहे.

याशिवाय, संशोधकांनी विविध तारे, द्वीज प्रणाली आणि तारकीय किरण असलेल्या वेगवेगळ्या वस्तुमानाच्या कृष्णविवरांच्या निर्मितीतील विविध स्रोतांचा अभ्यास केला. बहुतेक तारकीय कृष्णविवरं मुख्यतः तारकीय किरणांच्या हलत्या घटनांमुळं निर्माण होतात, असं या अभ्यासातून लक्षात आलं. हे संशोधन खगोल भौतिकशास्त्र, आकाशगंगा निर्मिती (Galaxy formation), गुरुत्वीय लहरी (Gravitational wave) यांसारख्या विविध शाखांतील संशोधनासाठी फायद्याचं ठरणार आहे.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयNASAनासाJara hatkeजरा हटके