संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. भारता सुरू असलेल्या या निवडणुकीकडे केवळ शेजारील चीन आणि पाकिस्तानचेच नव्हे, तर संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. आतापर्यंत निवडणुकीचे 4 टप्पे पार पडले आहेत. 20 मे रोजी निवडणुकीच्या 5व्या टप्प्यातील मतदान होईल. यातच, पंतप्रधान नरेंद्र मोदी अथवा भाजपला किती जागा मिळणार? यासंदर्भात चीननंतर आता पाकिस्ताननेही मोठी भविष्यवाणी केली आहे.
देशात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात देशातून आणि जगभरातूनही विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी अथवा भाजप 230 जागा जिंकेल, असे विरोधकांनी म्हटले आहे. तसेच, झी न्यूज हिंदीने दिलेल्या वृत्तानुसार, भाजपला अथवा नरेंद्र मोदी यांना 430 जागा मिळतील, असे चीनने म्हटले आहे. तर आता पाकिस्तानात कुणी 335, तर कुणी 370 जागांचाही अंदाज व्यक्त करत आहेत. मात्र हे दोन्ही आकडे, पंतप्रधान मोदींच्या अंदाजापेक्षा अर्थात 400 पारपेक्षा कमी आहेत.
तत्पूर्वी, बाल्टीमोर येथील पाकिस्तानी वंशाचे अमेरिकन उद्योगपती साजिद तरार यांनी पंतप्रधान नरेद्र मोदी यांचे तोंडभरून कौतुक केले आहे. ते म्हणाले, मोदी केवळ भारतच नाही, तर संपूर्ण क्षेत्र आणि जगासाठीही चांगले आहेत. एवढेच नाही, तर पाकिस्तानलाही त्यांच्यासारखा कुणी नेता मिळेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.