प्रश्न: माझ्याकडे सी1/डी क्रू व्हिसा आहे. मी त्याचा योग्य वापर कसा करू शकतो?उत्तर: अमेरिकेला प्रवास करताना तुम्ही तुमचा वैध पासपोर्ट आणि सी१/डी व्हिसा सोबत ठेवायला हवा. तुम्हाला नोकरी देणाऱ्या व्यक्तीनं दिलेल्या पत्रातील ठिकाणीच तुम्ही नोकरी करायला हवी आणि अमेरिकेच्या कस्टम आणि सीमा सुरक्षानं काही कागदपत्रं मागितल्यास त्यांची पूर्तता करायला हवी. सी१/डी व्हिसाच्या आधारे जहाजावर काम करताना तुमच्याकडे वैध एम्प्लॉयमेंट ऑफर असायला हवी. कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याला नोकरीचं बोगस नियुक्तीपत्र अथवा अन्य कोणतीही बोगस कागदपत्रं दाखवल्यास व्हिसा रद्द केला जाऊ शकतो आणि/किंवा व्हिसासाठी अपात्र ठरवलं जाऊ शकतं. अशा व्यक्तींना अमेरिकेत कधीही प्रवेश दिला जात नाही. खबरदारीचा उपाय म्हणून प्रवास सी१/डी व्हिसावर प्रवास सुरू करण्याआधी भारताच्या शिपिंग महासंचालकांचं संकेतस्थळ तपासा. तुम्हाला नियुक्तीपत्र जारी करणारी शिपिंग कंपनी किंवा मॅनिंग एजन्सी नोंदणीकृत आहे ना, तिच्याकडे वैध आरपीएसएल (रजिस्ट्रेशन अँड प्लेसमेंट सर्विसेस लायसन्स) आहे ना, याची खातरजमा करा. तुम्ही या संकेतस्थळावर जाऊन माहिती पडताळून पाहू शकता. http://www.dgshipping.gov.in/Content/RPSAgencies.aspx
पहिल्यांदाच प्रवास करणारे बहुतांश जण अमेरिकेच्या एमिग्रेशन कायद्यांबद्दल आणि त्याच्या उल्लंघनानंतर होणाऱ्या परिणामांबद्दल अनभिज्ञ असतात. अमेरिकेच्या सागरी हद्दीत किंवा अमेरिकेच्या बंदरांवर असताना तुम्ही सी१/डी स्टेटसची काळजी घ्यायला हवी. जर तुम्हाला किनाऱ्याहून सुट्टी घ्यायची असल्यास तुमचं वास्तव्य असलेल्या बंदराच्या हद्दीच्या बाहेरील डॉक्टरकडे जा किंवा दुसऱ्या क्रूमध्ये सहभागी व्हा. तुमच्याकडे असलेला सी१/डी व्हिसा वैध असायला हवा. अन्यथा तुम्हाला प्रवेश मिळणार नाही. सी१/डी व्हिसावर अमेरिकेत प्रवेश केल्यानंतर तुम्हाला जमिनीवर काम करता येणार नाही. तुमची नियुक्ती करणाऱ्या कंपनीला जमिनीवर काम करण्याची परवानगी असली तरीही तुम्हाला ते काम करता येणार नाही. तुम्हाला लायटरिंगशी संबंधित कामं करायची असल्यास किंवा परदेशी मालकीच्या जहाजांवर काम करायचं असल्यास हाच नियम लागू आहे.
सी१/डी स्टेटस मेंटेन करण्याचा अर्थ तुम्ही अमेरिकेत आल्याच्या २९ दिवसांत पुन्हा माघरी जाणं असा होतो. तुम्ही तुमच्या शिपवर जाण्यात अपयशी ठरल्यास किंवा दिलेल्या वेळेत अमेरिका सोडून न गेल्यास तुम्हाला त्याचे परिणाम सहन करावे लागू शकतात. तुमचा व्हिसा रद्द केला जाऊ शकतो किंवा त्याचं नुतनीकरण नाकारलं जाऊ शकतं. तुमच्याविरोधात पोलीस तक्रार दाखल होऊ शकते. भारताचे शिपिंग महासंचालक तुमचं सीडीसी रद्द करू शकतात. तुमचा पासपोर्ट रद्द करण्याची शिफारस ते परराष्ट्र मंत्रालयाकडे करू शकतात किंवा नाविक म्हणून भारतीय ई-गव्हर्नन्स आणि ई-मायग्रेट यंत्रणेकडून तुम्हाला मिळणारे सर्व विशेषाधिकार काढून घेतले जाऊ शकतात.
अमेरिकेला जात असताना सी१/डी व्हिसाशी संबंधित नियम समजून घ्यावेत यासाठी आम्ही नाविकांना प्रोत्साहन देतो. या लेखामुळे तुम्हाला अतिरिक्त मदत मिळाली असेल अशी आम्हाला आशा आहे. तुमच्याकडे असलेल्या सी१/डी व्हिसाच्या वैधतेबद्दल तुमच्या मनात काही प्रश्न असल्यास तुम्ही तुमच्या मॅनिंग एजन्सीशी बोलू शकता. अधिक माहितीसाठी www.ustraveldocs.com/in या संकेतस्थळावर जा किंवा (91-120) 484-4644, (91-22) 6201-1000 या कॉल सेंटरच्या नंबरवर किंवा अमेरिकेहून 1-703-520-2239 या नंबरवर संपर्क करू शकता. तुम्ही support-india@ustraveldocs.com वर ईमेलदेखील करू शकता.महत्त्वाची सूचना: व्हिसा आणि दूतावासाशी संबंधित पडलेल्या तुमच्या प्रश्नांना उत्तर मिळण्याचं योग्य ठिकाण म्हणजे http://www.ustraveldocs.com/in या कॉलममधून आम्ही विशिष्ट व्हिसा प्रकरणांशी संबंधित प्रश्नांची उत्तरं देत नाही. व्हिसासंबंधित सामान्य प्रश्नांची उत्तरं आम्ही देतो. तुम्हाला विशिष्ट व्हिसाबद्दल प्रश्न विचारायचे असल्यास, support-india@ustraveldocs.com वर संपर्क साधा. अमेरिकन व्हिसाचे सर्व अर्जदार अर्जाचा आयडी आणि क्रमांकासह त्यांनी अर्ज केलेल्या व्हिसाचं स्टेटस http://ceac.state.gov/ceacवर जाऊन तपासू शकता. फेसबुकवर आमचं www.facebook.com/Mumbai.USConsulate पेज लाईक करा. तर ट्विटरसाठी http://twitter.com/USAndMumbai क्लिक करून आम्हाला फॉलो करा.