तैपेई - चीनपासून अवघ्या 110 मैलावर तैनान नावाचा देश आहे. येथे कोरोनाचा पहिला रुग्ण जानेवारी महिन्यात आढळला होता. याच्या एकमहिना आधीच कोरोनाने चीनमध्ये हातपाय पसरायला सुरुवात केली होती. चीनमध्ये आतापर्यंत जवळपास 81 हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र तैवानमध्ये आतापर्यंत कोरोनाचे केवळ 235 रुग्णच आढळून आले आहेत. तैवान कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात यशस्वी झाला आहे. याचे मुख्यकारण म्हणजे वेळ असतानाच तैवान सावध झाला.
चीनच्या तुलनेत तैवानकडे साधनसामग्री अत्यंत कमी आहे. मात्र त्यांनी उपलब्ध साधनसामग्रीचा अत्यंत योग्य प्रकारे वापर केला आणि कोरोना व्हायरसचे संकट आक्रारविक्राळ रूप धारण करण्यापूर्वीच रोखले.
तैवानमधील सेंट्रल अॅपिडेमिक कमांड सेंटरने तेथील आरोग्य मंत्रालयाच्या सोबतीने एका खास योजनेवर काम करायला सुरुवात केली. यामुळे येथे कोरोनाने महामारीचे रूप धारण केले नाही. कमांड सेंटरने डिसेंबर महिन्यापासूनच तैवानमध्ये येणाऱ्या प्रवाशांची स्क्रीनिंग सुरू केली होती. विशेष म्हणजे तैवानमध्ये जेव्हा एकही कोरोनाग्रस्त नव्हता, तेव्हाच त्यांच्या कमांड सेंटर आणि आरोग्य मंत्रालयाने मास्क आणि इतर आवश्यक वस्तू तयार करायला सुरूवात केली होती. एवढेच नाही, तर दुसऱ्या देशांतून तैवानमध्ये येणाऱ्या सर्वांसाठीच दोन आठवडे क्वारंटाइनमध्ये जाणे अनिवार्य करण्यात आले होते.
संरक्षण दलाच्या जवानांनी तयार केले मास्क आणि सॅनिटायझरचीनमध्ये कोरोनाचा प्रसार होऊ लागताच त्याच्यापासून बचावासाठी तैवानने सर्व शक्य ते प्रयत्न केले. इतर देशांमध्ये संरक्षण दलाच्या जवानांना लॉकडाउन आणि शटडाउनची जबाबदारी दिली जाते. मात्र तैवानने आपल्या जवानांना, कोरोनापासून बचावासाठी, ज्या कंपन्यांमध्ये विविध प्रकारचे साहित्य, जसे - मास्क, टेस्ट, सॅनिटायझर आणि इतर वस्तू तयार केल्या जातात तेथे कामाला लावले.
तैवानचे जवानही एवढे कुशल होते, की त्यांनी सरकारने दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. यामुळे सामान्यांना मस्क, सॅनिटायझर आणि आवश्यक गोष्टी सहजतेने उपलब्ध झाल्या.
येथील टोबॅको अँड लिकर कॉरपोरेशनने कोरोनापासून संरक्षणासाठी 75 टक्के अल्कोहोल सॅनिटायझेशनसाठी उपलब्ध केले. तैवानमध्ये डिजिटल थर्मामीटर, मास्क आणि व्हेंटिलेटर आदिंच्या निर्यातीवर 04 मार्च ते 31 मार्चपर्यंत बंदी घालण्यात आली आहे.