शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी केला पलटवार, काय दिलं उत्तर?
2
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
3
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
4
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
5
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
6
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
7
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
8
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
9
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
10
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
11
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
12
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
13
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
14
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
15
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
16
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
17
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
18
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
19
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
20
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात

इमिग्रेशन एँड नॅशनॅलिटी कायद्याच्या अंतर्गत रद्द झालेल्या व्हिसा अर्जासाठी प्रक्रिया कशी सुरू करावी?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2022 2:53 PM

तुमच्या अर्जावर पुढील प्रक्रिया करण्यासाठी तुम्हाला अमेरिकेच्या दुतावासाशी संपर्क साधण्याची गरज नाही. आम्ही अशा प्रकरणांमध्ये लक्ष घालून तुमच्या अर्जावर नमूद केलेल्या ईमेलवर संपर्क साधू.

प्रश्न- मी मुंबईतील दुतावासात व्हिसासाठी अर्ज केला होता. पण तिथल्या अधिकाऱ्यानं इमिग्रेशन एँड नॅशनॅलिटी कायद्याच्या कलम २२१ (जी) अंतर्गत पी. पी. १०१९९ रद्द झाल्याचं पत्र माझ्या हाती दिलं. आता ते प्रोक्लेमेशन हटवण्यात आलं आहे. त्यामुळे मी माझ्या अर्जाची प्रक्रिया सुरू करावी का?

उत्तर-  २५ ऑक्टोबरला अध्यक्ष बायडेन यांनी नवीन प्रेसिडेन्शियल प्रोक्लेमेशन जारी केलं. त्याचं शीर्षक 'प्रोक्लेमेशन ऑन ऍडव्हान्सिंग द सेफ रिज्मशन ऑफ ग्लोबल ट्रॅव्हल ड्युरिंग द कोविड-१९ पॅन्डेमिक' असं आहे. नव्या प्रेसिडेन्शियल प्रोक्लेमेशनमुळे अमेरिकेच्या दुतावासांना व्हिसा अर्जावर प्रक्रिया करण्याची परवानगी मिळाली आहे. इमिग्रेशन एँड नॅशनॅलिटी कायद्याच्या कलम २२१ (जी) अंतर्गत रद्द करण्यात आलेल्या अर्जांवर प्रक्रिया करण्याची मंजुरी आता दुतावासांना मिळाली आहे.

तुमच्या अर्जावर पुढील प्रक्रिया करण्यासाठी तुम्हाला अमेरिकेच्या दुतावासाशी संपर्क साधण्याची गरज नाही. आम्ही अशा प्रकरणांमध्ये लक्ष घालून तुमच्या अर्जावर नमूद केलेल्या ईमेलवर संपर्क साधू. तुमच्या मुलाखत अर्जावर देण्यात आलेला ईमेल ऍड्रेस हाच तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे ही बाब लक्षात ठेवा. त्यामुळे अर्जदारांनी त्यांचे ईमेल काळजीपूर्वक तपासावेत. तुम्ही चुकीचा ई-मेल ऍड्रेस भरला आहे किंवा चुकून तो डिलीट केला आहे, असं तुम्हाला वाटत असेल, तर india@ustraveldocs.com वर संपर्क साधा.

मेल आल्यावर त्यात देण्यात आलेल्या सुचनांनुसार कृती करा. ईमेलमधून अतिरिक्त माहिती मागितली जाऊ शकते. मुंबईतील दुतावासात तुम्हाला मुलाखतीसाठी पुन्हा हजर राहण्यास सांगितलं जाऊ शकतं किंवा दुतावासात तुम्हाला पासपोर्ट जमा करण्यास सांगितलं जाऊ शकतं. तुमच्या बाबतीत असलेली सूचना ईमेलमध्ये स्पष्टपणे नमूद केलेली असेल. कृपया त्या सुचनांचं पालन करा.महत्त्वाची सूचना: व्हिसा आणि दूतावासाशी संबंधित पडलेल्या तुमच्या प्रश्नांना उत्तर मिळण्याचं योग्य  ठिकाण म्हणजे http://www.ustraveldocs.com/in या कॉलममधून आम्ही विशिष्ट व्हिसा प्रकरणांशी संबंधित प्रश्नांची उत्तरं देत नाही. व्हिसासंबंधित सामान्य प्रश्नांची उत्तरं आम्ही देतो. तुम्हाला विशिष्ट व्हिसाबद्दल प्रश्न विचारायचे असल्यास, support-india@ustraveldocs.com वर संपर्क साधा. अमेरिकन व्हिसाचे सर्व अर्जदार अर्जाचा आयडी आणि क्रमांकासह त्यांनी अर्ज केलेल्या व्हिसाचं स्टेटस http://ceac.state.gov/ceacवर जाऊन तपासू शकता. फेसबुकवर आमचं www.facebook.com/Mumbai.USConsulate पेज लाईक करा. तर ट्विटरसाठी http://twitter.com/USAndMumbai क्लिक करून आम्हाला फॉलो करा.

टॅग्स :AmericaअमेरिकाVisaव्हिसा