ह्युस्टन - आज ह्युस्टनमध्ये होणाऱ्या हाऊडी मोदी कार्यक्रमाकडे भारत आणि अमेरिकेसह संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एकत्र येणार असल्याने या कार्यक्रमाला विशेष महत्त्व आले आहे. दरम्यान, या कार्यक्रमाच्या वेळेविषयी सर्वांनाच उत्सुकता असून, भारतीय प्रमाणवेळेनुसार हा कार्यक्रम संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होणार आहे. ह्युस्टनमधील एनआरजी स्टेडियममध्ये हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला सुमारे ५० हजार भारतीय आणि अमेरिकी नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमासाठी एनआजी स्टेडियमचे गेट भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ४.३० वाजता उघडण्यात येतील. संध्याकाळी ७.३० वाजता सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात होईल. रात्री ९ वाजेपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम चालतील. तसेच नंतर मोदी आणि ट्रम्प उपस्थितांना संबोधित करतील. भारतीय वेळेनुसार रात्री ११ वाजता कार्यक्रमाची समाप्ती होईल.
Howdy Modi : ही आहे 'हाऊडी मोदी' कार्यक्रमाची भारतीय वेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2019 3:39 PM