आपल्या देशात एरव्ही माणसांच्या जिवाची किंमत काय आहे? हजारोंनी जत्थ्थे निघालेत गावांकडे, त्यांचे हाल कोण विचारतं? गेल्या वर्षभरांत शेतकरी आत्महत्यांची संख्या काढा, तो आकडा अंगावर येईल. रस्ते अपघात?- त्यात दगावणारी माणसं, जखमी होणारी माणसं यांची संख्याही मोठी आहे.त्यामुळे कोरोनाच्या याकाळात त्या आकडेवारीकडेही लक्ष द्यायला हवी. सगळा देश लॉकडाऊनमध्ये असताना आणि यंत्रणोवर आधीच कामाचा इतका ताण असताना पुरेशी आकडेवारी सध्या मिळणं शक्य नाही. मात्र तरीही एक अंदाज घेतला तर काय चित्रं दिसतं?ते चित्र असं म्हणतं की, दिवसाला भारतात सरासरी 41क् लोक रस्ते अपघातात दगावतात. जे जखमी होतात, त्यांची संख्या वेगळी. अगदी ढोबळ अंदाज लावायचा म्हटला तरी लॉकडाऊनमुळे रस्ते वाहतूक बंद असल्याने किमान 35क् लोकांचे जरी प्राण वाचतात असं ग्ृहित धरलं तरी 21 दिवसांत किती लोकांचे प्राण वाचले याचा अंदाज काढा.व्हॉट्सअॅपवर फिरणा:या विनोदासारखं नाही, ही वस्तुस्थिती आहे कारण जगभरात सर्वाधिक माणसं भारतातच रस्ते अपघातात दगावतात.दुसरा एक या काळाचा फायदा दाखवणारे काही फोटो सध्या व्हायरल आहेत. केरळमध्ये तर एक सांबर रस्ता क्रॉस करत असल्याचा फोटो व्हायरल झाला आहे. माणसं घरांच्या पिंज:यात आणि प्राणी कधी नव्हे ते रस्त्यावर निवांत फिरत आहेत. अगदी पक्षी रस्त्यावर उतरले आहेत. गायी, श्वान, रस्त्यावर निवांत झोपल्या आहेत.हे चित्र खरोखरच वेगळं आहे.
या शहरांवर, इथल्या जगण्यावर प्राण्यांचाही तेवढाच हक्क आहे, हे तरी निदान यानिमित्तानं समोर आलं.अर्थात यासा:यात काही भली माणसंही आहेतच. रस्त्यावर राहणारे श्वान, फिरणा:या गायी यांना खायला कोण घालणार असं म्हणत अनेकांनी फेसबूक कॅम्पेन सुरु केल्या आहेत. ब:याच प्राणीमित्रंचं म्हणणं की मुख्यत: श्वानांना आयतं खायला घालून माणसांनीच त्यांच्या सवयी बिघडवल्या, अनेकांना आता स्वत:चं अन्न शोधता येत नाही.तर जरा आपल्या परिसरात, श्वानांना अन्न मिळेल असंही पहा!जरा शांत, स्थिर जगणं यानिमित्तानं माणसांच्या वाटय़ाला आलं आहे, ते टिकेल की पुन्हा रिव्हर्स गिअर टाकेल याचं उत्तर येणारा काळ देईलच!