न्यूयॉर्क : भारत व पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिव पातळीवरील वाटाघाटीआधी पाक उच्चायुक्तांनी नवी दिल्ली येथे हुरियत नेत्यांशी चर्चा केल्यामुळे भारताने या वाटाघाटी रद्द केल्या. पाकिस्तानच्या उच्चायुक्तांनी हुरियत नेत्यांशी चर्चा करण्याची वेळ चुकीची ठरली अशी कबुली आज पाकने दिली आहे. २५ आॅगस्ट रोजी इस्लामाबाद येथे भारत व पाक यांच्या परराष्ट्र सचिवांची बैठक होणार होती; पण पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी या बैठकीआधी हुरियत नेत्यांची भेट घेतली. त्यामुळे भारताने २५ आॅगस्टची चर्चा रद्द केली. हुरियत नेत्यांना भेटण्याची उच्चायुक्तांची वेळ चुकली असे आता पाक म्हणत आहे. पाकिस्तानी मुत्सद्दी हुरियत नेत्यांना नेहमीच भेटतात, गेल्या ३० वर्षांपासूनचा हा रिवाज आहे, त्यात नवे काही नाही, असे पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा व परराष्ट्रविषयक सल्लागार सरताज अजीज म्हणाले; पण काश्मीरवर भरीव चर्चा अजून सुरूझालेली नाही, त्यामुळे बासित यांची हुरियत नेत्यांना भेटण्याची वेळ चुकली असे अजीज यांनी पुढे सांगितले.भारताने या कृतीला योग्य ती प्रतिक्रिया देत वाटाघाटी रद्द केल्या; पण सरताज यांच्यामते भारताची ही प्रतिक्रिया थोडी अधिकच होती. काश्मिरी नेत्यांना भेटण्याचा हक्क पाकिस्तानला गमवायचा नव्हता. पाकिस्तानी उच्चायुक्त बासित त्याला भेटले. भारताचे पंतप्रधान मोदी यांच्या संयुक्त राष्ट्रातील आमसभेच्या भाषणावर ते प्रतिक्रिया देत होते.
हुरियत नेत्यांना भेटण्याची वेळ चुकली
By admin | Published: September 29, 2014 5:59 AM