प्रेमासाठी माणूस काहीही करू शकतो. अशीच एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. एक महिला आपल्या आजारी पतीसाठी लढत आहे. ही महिला त्याच्या उपचारासाठी, औषधासाठी पैसे गोळा करत आहे. आपल्या मुलांसह मोमोज विकत आहे. चीनमधील एका शहरात ही घटना घडली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या महिलेचे नाव नी असं आहे. महिलेचे 2016 मध्ये लग्न झाले असून तिला दोन मुले आहेत.
3 महिन्यांपूर्वी महिलेच्या पतीच्या कारचा भीषण अपघात झाला होता, त्यानंतर त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्याच दरम्यान ते कोमात गेले. पतीच्या उपचारासाठी महिलेने आपलं घर विकले पण तरीही उपचार पूर्ण झाले नाहीत. रिपोर्ट्सनुसार, नुकतेच हॉस्पिटलमधून बाहेर आल्यानंतर महिलेने मोमोज विकायला सुरुवात केली.
पतीचे तीन ऑपरेशन झाले असून यामध्ये बराच पैसा खर्च झाल्याचे सांगण्यात येत आहे. घर चालवण्यासाठी ती तिच्या दुकानातून पैसे कमवते. अलीकडेच तिची डोळे पाणावणारी गोष्ट जोरदार व्हायरल झाली आहे. कितीही अडचणी आल्या तरी मला जे हवे आहे ते मिळेलच असे या महिलेचे म्हणणे आहे. मी त्यांच्यावर प्रेम करते. मी कठोर परिश्रम करून त्यांचे रक्षण करीन असंही तिने म्हटलं आहे.
मी पती परत शुद्धीत येण्याची वाट पाहत असल्याचं महिलेने सांगितले. एक वर्ष, दोन वर्षे, तीन वर्षे किंवा वर्षे वाट पाहावी लागेल, मी करत राहीन. त्याचबरोबर आता महिलेच्या पतीच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे सांगण्यात येत आहे. लवकरच कोमातून बाहेर येण्याची आशा डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. सध्या सोशल मीडियावर लोक या महिलेचे कौतुक करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"