लंडन : पाण्याखाली सक्रिय असणारा रोबो शास्त्रज्ञांनी तयार केला असून हा रोबो पाण्याखाली जलद गतीने चालू शकतो असा शास्त्रज्ञांचा दावा आहे. मानवनिर्मित वाहनापेक्षा याची गती जास्त असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. युनिव्हर्सिटी आॅफ साऊथ हॅम्पटन, एमआयटी, सिंगापूर एमआयटी या संस्थांतील तज्ज्ञांनी आॅक्टोपससारखा दिसणारा हा रोबो तयार केला आहे. या रोबोची लांबी ३० सें.मी. असून, पाण्यात सोडला असता, पाणी भरून घेत हा रोबो खाली जातो व पाणी सोडत वर येतो. रोबो मोठा केला तर त्याच्या गतीतही वाढ होईल असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. या रोबोच्या साहाय्याने पाण्याखाली काम करणाऱ्या कृत्रिम वाहनांची गती वाढवता येईल. एक पातळ आवरण व त्याला लावलेले पातळ पाय या खेरीज जा रोबोत काहीही नाही. त्याचे कोणतेही भाग काढावे लागणार नाहीत. त्यामुळे हा रोबो वापरणे अगदी सोपे सुटसुटीत आहे असे प्रमुख संशोधक गॅब्रिअल वेमाऊथ यांनी म्हटले आहे. बायोइन्स्पिरेशन अँड बायोमिमेटिक्स मध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आले आहे.
पाण्याखाली काम करणारा आॅक्टोपससारखा रोबो
By admin | Published: February 09, 2015 12:18 AM