वॉशिंग्टन : व्हाईट हाउसमध्ये मी एकटा पडलो आहे, असे उद्गार हताश झालेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नाताळच्या पहिल्याच दिवशी काढले आहेत. अमेरिका-मेक्सिकोच्या सीमेवर संरक्षक भिंत बांधण्यासाठी निधी मंजूर करण्यास सिनेटमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाच्या सदस्यांनी नकार दिल्याने त्या देशात सुरू झालेल्या अंशत: टाळेबंदीचा सोमवारी तिसरा दिवस होता.या स्थितीमुळे ट्रम्प यांनी फ्लोरिडा येथील रिसॉर्ट येथे सहलीसाठी जाणेही रद्द केले आहे. मंगळवारी ट्रम्प यांनी निराश मनाने अनेक टष्ट्वीट केली. त्यात म्हटले आहे की, संरक्षण भिंतीसंदर्भातील निधीच्या मुद्यावर तोडगा काढण्यासाठी डेमोक्रॅटिक पक्षाच्या सदस्यांनी व्हाईट हाउसमध्ये येऊन चर्चा करावी. त्यांची मी वाट पाहत आहे.मी दिवसभर खूप काम करीत आहे आणि विरोधक मात्र नाताळनिमित्त सुरू असलेल्या जल्लोषात मग्न आहेत, अशी टीकाही ट्रम्प यांनी केली. आपले हे म्हणणे सिद्ध करण्यासाठी त्यांनी टष्ट्वीटसोबत काही छायाचित्रेही झळकवलीआहेत.अमेरिकेत मेक्सिकोतून होणारी घुसखोरी थांबविण्यासाठी तेथील सीमेवर संरक्षक भिंत बांधू, असे आश्वासन ट्रम्प यांनी मतदारांना दिले होते. त्याची पूर्तता करण्यासाठी त्यांची आता धडपड सुरू आहे. या बांधकामासाठी ५ अब्ज डॉलर खर्च येणार असून, त्याला डेमोक्रॅटिक पक्ष मंजुरी देण्यास तयार नाही. ही भूमिका म्हणजे देशाच्या सुरक्षेशी खेळ करण्यासारखे आहे, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. (वृत्तसंस्था)बेफिकिरीचा आरोपव्हाईट हाउसमधील ओव्हल आॅफिसमध्ये उत्तर कोरियाच्या प्रश्नावर एका अधिकाऱ्याशी चर्चा करतानाचे छायाचित्र ट्रम्प यांनी टष्ट्वीटसोबत दिले आहे. त्या देशाचे अध्यक्ष किम जाँग उन यांच्याबरोबरील आगामी बैठकीची तयारी आम्ही करीत आहोत, असेही त्यांनी म्हटले आहे.अंशत: टाळेबंदी असतानाही देशाच्या सुरक्षेबद्दलचे महत्त्वाचे काम पूर्ण करण्यावर माझ्या सरकारने लक्ष केंद्रित केले असून, विरोधक मात्र बेफिकीर आहेत, असे जनतेच्या मनावर ठसविण्याचा ट्रम्प यांचा सोमवारी प्रयत्न सुरू होता.
व्हाईट हाउसमध्ये मी एकाकी पडलो आहे, ट्रम्प झाले हताश
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 6:15 AM