शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
2
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
4
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
5
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
6
मुंबईमध्ये अपक्षांना थारा नाहीच! ३६ मतदारसंघांतील आकेडवारी काय सांगते?
7
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?
8
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
9
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
10
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
11
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
12
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
13
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर
14
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
15
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
16
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
17
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
18
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
19
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
20
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन

माझ्यावर आयएसच्या किती जणांनी बलात्कार, केला माहीत नाही

By admin | Published: September 17, 2016 3:21 AM

इस्लामिक स्टेटच्या (आयएस) अतिरेक्यांनी आॅगस्ट २०१४ मध्ये अपहरण केलेल्या नादिया मुराद हिने त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये स्व:ची कशीबशी सुटका करून घेतली.

न्यूयॉर्क : इस्लामिक स्टेटच्या (आयएस) अतिरेक्यांनी आॅगस्ट २०१४ मध्ये अपहरण केलेल्या नादिया मुराद हिने त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये स्व:ची कशीबशी सुटका करून घेतली. या साधारण तीन महिन्यांत नादियाने नरक अनुभवला, अनेकांकडून झालेले बलात्कार सोसले, मारहाण सहन केली. आता ती म्हणते की त्या अतिरेक्यांना शिक्षा झाल्याशिवाय मला न्याय मिळणार नाही.

ब्रिटनचे पंतप्रधान टोनी ब्लेअर यांनी इराकशी युद्ध करण्याचा निर्णय घेतला त्यावर्षी नादिया आठ वर्षांची होती. त्या युद्धाने इराक अस्थिर झाला व त्याची खूप हानी झाली व याच वातावरणात इस्लामिक स्टेट शक्तिशाली बनली. या युद्धाने नादियाला काय दिले हे बघण्यासाठी टोनी ब्लेअर यांनी तिला भेटले पाहिजे. इराकशी झालेल्या युद्धामुळे नादियाला शारीरिक आणि मानसिक यातना काय काय भोगाव्या लागल्या हे त्यांना समजेल.

इराकमधील अत्यंत पुरातन अशा याझिदी समाजाचा इस्लामिक स्टेट अत्यंत द्वेष करते. आॅगस्ट २०१४ मध्ये तिचे या अतिरेक्यांनी अपहरण केले. माझ्यावर किती लोकांनी बलात्कार केला हे मला सांगताही येणार नाही, असे ती म्हणते. त्या लोकांशी लढण्याचे मी लवकरच थांबविले व मला दुसऱ्याच एका जगात प्रवेश करावा लागला. तेथे माझ्यावर बलात्कार झाले. नादियासह पाच हजार महिलांना पळवले होतेयाझिदीतून आयएसने आॅगस्ट २०१४ मध्ये नादियासह पाच हजार महिलांना पळवून नेले होते. याझिदी समाज हा इस्लाम आणि ख्रिश्चॅनिटी अशा दोन्ही धर्मांपासून अस्तित्वात आलेला. परंतु उत्तर सिरिया, उत्तर इराक आणि पूर्व तुर्कीमध्ये त्यांना सैतानाचे उपासक समजले जाते. नादियाच्या डोळ््यांदेखत तिच्या सहा भावांना व आर्ईला ठार मारण्यात आले. त्याच दिवशी तिच्या खेड्यातील ३०० लोकांना ठार मारले गेले. नादिया, तिच्या बहिणी, तिच्या चुलत बहिणी, भाच्या अशांचा इस्लामिक स्टेटच्या अतिरेक्यांशी जबरदस्तीने ‘विवाह’ लावण्यात आले. ज्या पुरुषांनी नादियावर बलात्कार केला त्यांनी कधीही स्व:ची ओळख पटू दिली नाही. तीन महिन्यांनंतर नादियाने स्व:ची सुटका करून घेतली. आपण पकडले गेलो तर आपल्याला ठार मारले जाईल हे तिला माहीत होते. आता तिने जर्मनीमध्ये आश्रय घेतला आहे.