ह्युस्टन : १८ वर्षीय साल्वाडोर रामोसने अमेरिकेतील टेक्सास येथील लहान मुलांच्या शाळेत गोळीबार करण्यापूर्वी सोशल मीडियावर एक संदेश टाकला होता. ज्यात ‘मी हे करणार आहे’ असे लिहिले होते. त्याने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एका अनोळखी मुलीला मेसेज करत ‘माझ्याकडे थोडेसे रहस्य आहे जे मी तुम्हाला सांगू इच्छितो’ असेही म्हटले होते. त्यानंतर त्याने शाळेत गोळीबार केला.
रामोसने २ बंदुकींचे फोटो टाकून अनोळखी मुलीला टॅग करत मेसेज केला. त्यानंतर मंगळवारी सकाळी शूटिंगच्या आधी त्याने मुलीला पुन्हा मेसेज केला की, ‘मी हे करणार आहे’. त्यावर काय करणार आहेस, असे मुलीने विचारले असता ‘तुला ११ वाजेच्या आधी सांगेन’ असा त्याने रिप्लाय दिला. बंदुकीचे फोटो बघून घाबरले होते म्हणून त्याच्या मेसेजला रिप्लाय दिला,’ असे त्या मुलीने सांगितल्याचे समजते. दरम्यान, हल्लेखोराचे सोशल मीडिया अकाउंट बंद करण्यात आले आहे.