प्रश्न: माझा मुलगा अमेरिकेत राहत असून त्याकडे तिथले नागरिकत्व आहे. मला त्याच्यासोबत अमेरिकेत राहायचे आहे. तर मी कोणत्या व्हिसासाठी अर्ज करावा?
उत्तर: या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला त्याच्याजवळ किती कालावधीसाठी राहायचे आहे, यावर अवलंबून आहे. तुम्हाला त्याला भेटून परत भारतात परतायचे आहे का? की तुम्हाला कायमस्वरुपी अमेरिकेत त्याच्यासोबत वास्तव्य करायचे आहे? या प्रश्नांच्या उत्तरांवरुन तुम्ही नॉन इमिग्रंट व्हिझिटर व्हिसासाठी अर्ज करायचा की इमिग्रंट व्हिसासाठी अर्ज करायचा, हे ठरेल. जर तुम्हाला तुमच्या मुलाला भेटून थोड्या कालावधीनंतर परत यायचं असेल, तर तुम्हाला नॉन इमिग्रंट व्हिझिटर व्हिसासाठी अर्ज करावा लागेल. जेव्हा तुम्ही व्हिझिटर व्हिसासह अमेरिकेत जाता, तेव्हा इमिग्रेशन ऑफिसर तुम्हाला सहा महिने अमेरिकेत राहण्याची परवानगी देतात. जर तुम्हाला अमेरिकेत दीर्घ काळ वास्तव्य करायचे असल्यास यूएस सिटीझनशिप अॅण्ड इमिग्रेशन सर्व्हिसेसकडे (यूएससीआयएस) अर्ज करावा लागेल. भारतीय नागरिकांना अमेरिकेत वास्तव्य करायचे असल्यास त्यासाठी त्यांच्या अमेरिकेतील निकटच्या नातेवाईकानं त्यांच्या अमेरिकावारीचा खर्च उचलण्याची तयारी दर्शवणं आवश्यक असतं. इमिग्रंट व्हिसासाठी अर्ज करण्याआधीच ही तयारी दर्शवली जाणं गरजेचं असतं. तुम्हाला अमेरिकेला भेट देऊन मायदेशी परतायचं आहे की तिथेच वास्तव्य करायचंय, हा निर्णय अतिशय महत्त्वाचा असतो. याबद्दलच्या अधिक माहितीसाठी तुम्ही ustraveldocs.com/in ला भेट देऊ शकता.