वॉशिंग्टन : हिलरी क्लिंटन यांनी मंगळवारच्या महत्त्वपूर्ण प्राथमिक निवडणुकीपूर्वी डेमोक्रॅटिक पार्टीचे संभाव्य उमेदवार बनण्यासाठी आवश्यक तेवढे प्रतिनिधी आपण प्राप्त करू, असा विश्वास व्यक्त केला. ‘सीएनएन’ला दिलेल्या मुलाखतीत हिलरींनी म्हटले की, ‘मंगळवारी निर्णायक रीतीने मते मिळविण्यात व आवश्यक ती प्रतिनिधी संख्या प्राप्त करण्यात मी यशस्वी होईन.’ प्राथमिक निवडणूक प्रक्रियेला चार महिन्यांहून अधिकचा काळ लोटला असून, हिलरींकडे सध्या २३१३ प्रतिनिधी आहेत. संभाव्य उमेदवार बनण्यास आवश्यक २३८३ हा आकडा गाठण्यास आणखी ६० प्रतिनिधींची गरज आहे. हिलरींना कारावास व्हावारिपब्लिकन पक्षाचे संभाव्य उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांच्यावर घणाघाती हल्ला करताना त्यांना ‘चोर’ संबोधले. ई-मेल घोटाळ्यासाठी हिलरींना कारावास व्हायला हवा, असे ते म्हणाले.
मला उमेदवारी मिळेल!
By admin | Published: June 05, 2016 3:57 AM