पुतिन यांना अटक करा, ICC चा आदेश; पण मंगोलियाच्या कृत्यानं संपूर्ण जग अवाक!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 11:57 AM2024-09-03T11:57:08+5:302024-09-03T11:58:01+5:30

मंगोलिया हा आंतरराष्‍ट्रीय क्रिमिनल कोर्टाचा  (ICC) सदस्य देश आहे. हेग येथे असलेल्या आयसीसीने पुतिन यांच्याविरोधात युद्ध गुन्ह्यांसंदर्भात अटक वॉरंट जारी केले आहे.

icc arrest warrant against Russia vladimir putin mongolia defying orders whole world is stunned | पुतिन यांना अटक करा, ICC चा आदेश; पण मंगोलियाच्या कृत्यानं संपूर्ण जग अवाक!

पुतिन यांना अटक करा, ICC चा आदेश; पण मंगोलियाच्या कृत्यानं संपूर्ण जग अवाक!

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन 3 सप्टेंबरला मंगोलियाला दौऱ्यावर पोहोचले. मंगोलिया हा आंतरराष्‍ट्रीय क्रिमिनल कोर्टाचा  (ICC) सदस्य देश आहे. हेग येथे असलेल्या आयसीसीने पुतिन यांच्याविरोधात युद्ध गुन्ह्यांसंदर्भात अटक वॉरंट जारी केले आहे. 2022 मध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर युक्रेनियन मुलांचे बेकायदेशीरपणे प्रत्यार्पण केल्याबद्दल आयसीसीने पुतिन यांना दोषी ठरवले असून अटकेसाठी वॉरंट जारी केले आहे. 

या वॉरंटमुळे पुतिन कुठल्याही आयसीसी सदस्‍य देशात गेले, तर त्यांना या वॉरंटच्या आधारे अटक केली जाऊ शकते. याच आधारावर आयसीसीने मंगोलियाला पुतिन यांना अटक करण्यास सांगितले होते. मात्र, मंगोलियाने आयसीसीच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आणि राष्‍ट्रपती पुतिन यांचे एअरपोर्टवर रेड कार्पेट टाकून स्‍वागत केले. पुतिन आरामात हसत-हसत जाताना दिसले. यानंतर त्यांना गॉर्ड ऑफ ऑनरही देण्यात आले. तर दुसऱ्या बाजूला युक्रेनसह पश्चिचात्य देश मंगोलियाला पुतिन याना अटक करण्याचे केवळ आवाहनच करत राहिले. महत्वाचे म्हणजे पुतीन यांचा एखाद्या आयसीसी सदस्‍य देशांतील हा पहिलाच दौरा आहे. 

व्लादिमीर पुतिन यांच्या दौऱ्यापूर्वी, आयसीसीने मंगोलियाला आदेशांचे पालन करण्याच्या वचनबद्धतेसंदर्भात आठवण करून देत, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना मंगोलियात प्रवेश करताच अटक करण्यात यावी, असे सांगितले होते. मात्र, मंगोलियावर याचा कुठळाही परिणाम होत नसल्याचे पाहून, 2 सप्टेंबरला युक्रेनने आरोप केला की, पुतिन यांच्या युद्ध गुन्ह्यांची सामाईक जबाबदारी मंगोलियावरही असेल.

याशिवाय, मंगोलियाची राजधानी असलेल्या उलानबातारमध्ये पुतिन यांच्या विरोधात छोटेखाली निदर्शन झाल्याचेही दिसून आले. राजधानीच्या मध्यवर्ती चंगेज खान चौकात हे निदर्शन झाले.

मंगोलियावर काय परिणाम होणार? -
आता मंगोलियाने आयसीसीच्या नियमाचे पालन न केल्याने काय कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. मंगोलियावर नक्कीच कारवाई होईल, मात्र त्याचा फारसा परिणाम होणार नाही, यावर तज्ज्ञांचे एकमत आहे.

Web Title: icc arrest warrant against Russia vladimir putin mongolia defying orders whole world is stunned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.