शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपला नवी मुंबईतही धक्का बसण्याची शक्यता; गणेश नाईक पक्ष सोडण्याच्या विचारात? 
2
आमच्या मतदारांची नावे यादीतून वगळण्याचं भाजपा-शिंदे सेनेचं षडयंत्र; मविआचा आरोप
3
"उद्धव ठाकरेंना 'मविआ'समोर कटोरा घेऊन फिरावं लागतंय", चंद्रशेखर बावनकुळेंची बोचरी टीका
4
झारखंडचं जागावाटप ठरलं, महाराष्ट्राचं कधी?; NDA मध्ये भाजपा लढणार सर्वाधिक जागा
5
रात्रीस खेळ चाले! अंतरवाली सराटीत फेऱ्या वाढल्या; रात्री १ वाजता जरांगेंना भाजपा नेते भेटले
6
Diwali 2024: दिवाळीत 'या' वस्तूंची चुकूनही करू नका खरेदी; लक्ष्मी ऐवजी अलक्ष्मी येईल घरी!
7
आरोपीचा पक्ष कोणता हे पाहू नका, त्याला अटक करा; ठाणे प्रकरणावर राज ठाकरे संतापले
8
खुर्चीवर विराजमान होताच मुख्यमंत्री सैनी यांचा मोठा निर्णय; 'या' रुग्णांना मिळणार मोफत उपचार!
9
अस्सल मुंबईकर! फिल्डिंगमध्ये चेंडू लागल्याने मैदानाबाहेर गेला; बॅटिंगला मात्र वेळेत हजर झाला!
10
तरुणीच्या माध्यमातून मुंबई पोलिसांनी सापळा रचला, लॉरेन्स बिश्नोई टोळीचा शूटर हनीट्रॅपमुळे सापडला
11
IND vs NZ : रचिनची सेंच्युरी अन् साउदीची फिफ्टी; न्यूझीलंडचा पहिला डाव ४०० पार
12
“४ नोव्हेंबरला मोठा स्फोट होणार, मविआ-महायुतीचे एन्काउंटर करणार”; परिवर्तन महाशक्तीचा दावा
13
विक्रोळीत भाजी विक्रेत्यांकडून माजी महापौरांना धक्काबुक्की; दत्ता दळवींचे वॉर्ड ऑफिसवर आरोप
14
राज ठाकरेंचं पुत्र अमित ठाकरेंसाठी उद्धव ठाकरे गट माहिम मतदारसंघ सोडणार?
15
“भाजपाची बिष्णोई गँग त्रास देते, कसे लढायचे आम्हाला चांगले माहिती आहे”; संजय राऊतांची टीका
16
Diwali 2024: दिवाळीच्या दिवसात कशी ओळखावी खाद्यपदार्थातली भेसळ? करा 'हे' सोपे प्रयोग
17
Sharad Pawar News सिद्दिकींच्या हत्येनंतर केंद्रीय यंत्रणा सज्ज! शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा घेण्यासाठी केंद्राचा आग्रह
18
Manappuram Finance Shares: RBI च्या कारवाईनंतर 'या' शेअरमध्ये हाहाकार, गुंतवणूकदारांकडून विक्री; ₹१४७ वर आला भाव, एक्सपर्ट म्हणाले...
19
Baba Siddique : बाबा सिद्दिकींच्या हत्येवेळी सिक्योरिटी गार्ड काहीच का करू शकले नाहीत?, चौकशीदरम्यान खुलासा
20
शोएब अख्तरचा अंदाज ठरला खोटा; इंग्लंड विरुद्ध पाक संघानं विजय मिळवला मोठा

मृत्यूआधीच्या काही सेकंद आधी इस्रायलच्या ड्रोनवर केला हल्ला; दातांवरुन ओखळला सर्वात मोठ्या शत्रूचा मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 9:31 AM

हमासचा नवा म्होरक्या याह्या सिनवार इस्रायलच्या हल्ल्यात ठार झाल्याची माहिती इस्रायची लष्करान दिली आहे.

Hamas Chief Yahya Sinwar Eliminated : हमासचा नवा प्रमुख याह्या सिनवारही मारला गेला आहे. इस्रायलने त्याच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासने इस्रायल क्षेपणास्त्र डागून हल्ला केला होता.  या हल्ल्यात १२०० इस्रायली मारले गेले. त्यानंतरच इस्रायलने हमासविरुद्ध युद्धाची घोषणा केली होती. याह्या सिनवार हा या हल्ल्याचा मास्टरमाईंड होता. इस्रायली पोलिसांनी १७ ऑक्टोबर रोजी गाझा पट्टीमध्ये इस्रायली सैन्याने मारला गेलेला हमास प्रमुख याह्या सिनवार याचा मृतदेह ओळखला आहे.

दक्षिण गाझा पट्टीतील रफाह शहरात गुरुवारी इस्रायलने हल्ला केला. या हल्ल्यात तीन दहशतावाद्यांना लक्ष्य करण्यात आलं होतं. त्यापैकी एक याह्या सिनवार होता. हमासचा नवा म्होरक्या याह्या सिनवार इस्रायलच्या हल्ल्यात ठार झाल्याची माहिती इस्रायची लष्करी सेना आयडीएफने दिली आहे. इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनीही याबाबत दुजोरा दिला. इस्रायलचे परराष्ट्र मंत्री इस्रायल कॅट्झ यांनी सांगितले की, ऑक्टोबर २०१४ च्या हत्याकांड आणि अत्याचाराला जबाबदार असलेल्या याह्या सिनवारला आयडीएफने मारले. त्याचवेळी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले की, आम्ही ७ ऑक्टोबरचा स्कोअर सेट केला आहे पण युद्ध अजून बाकी आहे. ऑगस्टमध्ये इस्माईल हनियाच्या मृत्यूनंतर याह्या सिनवार हमासचा प्रमुख झाला होता. इस्माईल हनियाची इस्रायलने ३१ जुलै रोजी खात्मा केला होता.

इस्रायलने सिनवारला मारण्याच्या कारवाईचा व्हिडिओ समोर आणला आहे. या व्हिडिओमध्ये सिनवार इस्त्रायली ड्रोन आपल्या दिशेने येताना पाहतो आणि त्याला काठीने मारण्याचा प्रयत्न करतो. रफाहच्या तेल सुलतानमध्ये झालेल्या लढाईदरम्यान सिनवार मारला गेला. बिस्लामक ब्रिगेडच्या ४५० व्या बटालियनने एका इमारतीजवळ काही हालचाली पाहिल्यानंतर ही कारवाई केली. सकाळी दहाच्या सुमारास एका सैनिकाच्या हे लक्षात आले. त्याने आपल्या बटालियनला याची माहिती दिली आणि त्यानंतर कारवाई सुरू झाली.

डीएनए चाचणीच्या आधारे इस्रायलने याह्या सिनवारच्या मृतदेहाची ओळख पटवली आहे. पोलिस फॉरेन्सिक युनिटचे कमांडर असिस्टंट कमिशनर अलिझा रझील यांनी सांगितले की, लष्कराने दात आणि शरीराचे नमुने पाठवले आहेत. पोलीस दंतवैद्य आणि इस्रायलच्या न्यायवैद्यक औषध संस्थेने हे नमुने त्यांच्याकडे असलेल्या याह्या सिनवारसोबत जुळवून पाहिले. त्यावेळी हा मृतदेह याह्या सिनावारचा असल्याचे समोर आलं.

याह्या सिनवार हे अनेक नावांनी ओळखला जायचा. काहींनी त्याला 'हमासचा ओसामा बिन लादेन' म्हटलं, तर काहींनी त्याला 'खान युनूसचा जल्लाद' म्हटलं होतं. इस्रायल त्याला 'दहशतवादी हिटलर' म्हणत होतं. तो इतका क्रूर होता की त्याने हमासशी विश्वासघात आणि इस्रायलशी निष्ठा असल्याच्या संशयावरून पॅलेस्टिनींनाही छळले आणि ठार मारले होते. तो उघडपणे लहान मुलांसोबत बंदुका घेऊन वावरायचा.  गाझामध्ये पसरलेले बोगद्याचे जाळे हे त्याची ताकद होती.

सिनवारने इस्त्रायली तुरुंगात दोन दशकांहून अधिक काळ घालवला, जिथे त्याला अनेक वेळा उपचार घ्यावे लागले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, त्यापैकी अनेकवेळा त्याच्या जीवाला धोका होता पण तो सुदैवाने वाचला. गुरुवारी रात्री इस्रायली पोलिसांनी सिनवारचा मृतदेह मध्य इस्रायल मधल्या फॉरेन्सिक मेडिसिन इन्स्टिट्यूटला पाठवण्यात आला. 

टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्धPalestineपॅलेस्टाइन