ऑनलाइन लोकमत
बिजींग, दि. 2 - चीनच्या युगूर प्रांतातील इसिसकडून लढणा-या दहशतवाद्यांनी थेट चीनला धमकी दिली आहे. आपण मायदेशी परतल्यानंतर चीनमध्ये रक्ताच्या नद्या वाहतील असे या धमकीमध्ये त्यांनी म्हटले आहे. इसिसने पहिल्यांदाच अशा प्रकारची थेट धमकी चीनला दिल्याचे तज्ञांनी सांगितले.
पश्चिम इराकमधील इसिसच्या दहशतवाद्यांनी अर्ध्या तासाचा व्हिडीओ प्रसिद्धकरुन ही धमकी दिली आहे. चीनच्या युगूर प्रांतात चीनच्या दडपशाही धोरणा विरोधात मोठी अस्वस्थतता आहे. चीनी शासकांना थेट अशा प्रकारे लक्ष्य करुन जनतेची सहानुभूती मिळवण्याचाही या दहशतवाद्यांचा हेतू असू शकतो.
युगूरमधल्या हिंसाचारासाठी चीनने अनेकवर्षांपासून तिथल्या फुटीरतवाद्यांना जबाबदार धरले आहे. चीनी शासकांना लोक काय म्हणतात ते कधीच समजत नाही. आम्ही खिलाफतचे सैनिक आहोत. आम्ही तिथे येऊ आणि शस्त्राच्या भाषेमध्ये तुम्हाला समजावू असे या व्हिडीओमध्ये म्हटले आहे. चीनकडून सांस्कृतिक आणि धार्मिक दडपशाही करण्यात येते अशा युगूरमधल्या मुस्लिमांची तक्रार आहे.