उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांची मृत्यूशी झुंज सुरू असल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यांच्या हृदयावर काही दिवसांआधी शस्त्रक्रिया पार पडली होती. मात्र, त्यानंतर किम जोंग यांची प्रकृती खालावत असल्याचे वृत्त अमेरिकन वृत्तवाहिनी सीएनएनने दिले होते. अमेरिकेच्या किम जोंग यांच्या प्रकृतीबाबतच्या वृत्तामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. किम जोंग उन यांच्या प्रकृतीबाबत आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, किम जोंग उन यांच्या प्रकृतीबाबत अनेक बातम्या समोर येत आहे. माझे किम जोंग उन यांच्यासोबत चांगले संबंध आहे. जर त्यांची प्रकृती खरच नाजूक असेल तर ही गंभीर बाब आहे, अशी प्रतिक्रिया डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली.
अमेरिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, किम जोंग उन यांची प्रकृती मागील काही महिन्यांपासून ठिक नव्हती. लठ्ठपणाचा त्यांना त्रास होता. त्याशिवाय अति धुम्रपानाच्या आहारी ते गेले होते. किम हे ११ एप्रिल रोजी दिसले होते. इतकंच नव्हे किम यांचे आजोबा आणि उत्तर कोरियाचे दिवंगत नेते किम उल संग यांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या १५ एप्रिलच्या कार्यक्रमात त्यांची अनुपस्थिती होती. किम यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती या अधिकाऱ्याने दिली होती. मात्र किम जोंग उन यांची शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून हे सर्व वृत्त खोटी असल्याचा खुलासा दक्षिण कोरियाने केला आहे.
किम जोंग उन यांचे वडिल किम जोंग इल यांच्याबाबतही अशाच प्रकारच्या चर्चा सुरू होत्या. उत्तर कोरियाच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त ते गैरहजर होते. त्यावेळी ही उलटसुलट चर्चा सुरू होत्या. मात्र, त्यावेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला असल्याचे समोर आले होते. अखेर किम जोंग इल यांचे २०११ मध्ये निधन झाले. त्यानंतर किम जोंग उन यांच्या हाती उत्तर कोरियाच्या सत्तेची सूत्रे आली.
आणखी वाचा...
कोरोना एकटा नाहीय! आणखी एक महाभयंकर संकट घेऊन येतोय; संयुक्त राष्ट्राचा इशारा
लॉकडाऊनमुळे नरेंद्र मोदी लोकप्रियतेच्या शिखरावर; ट्रम्प संकटात
एड्स, स्वाईन फ्ल्यू अमेरिकेतून पसरला; कोणी जबाबदार धरले का? चीनचा सवाल
फेसबुक-Reliance Jioचा 'मेगा प्लॅन'; तीन कोटी दुकानदार, शेतकरी होणार मालामाल
संजय राऊत यांच्या 'त्या' टीकेवरून शिवसेनेतच नाराजी?; 'मातोश्री'ची भूमिका वेगळी