पाकव्याप्त काश्मीरच्या उत्तरेकडील गिलगिट बाल्टिस्तानमधील नागरिक गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानविरोधात आंदोलने करत आहेत. आम्हाला भारताच्या केंद्र शासित प्रदेश लडाखमध्ये विलिन करावे अशी मागणी ते करत आहेत.
पाकिस्तानमध्ये महागाईने लोकांचे कंबरडे मोडले आहे. लोकांना खायला अन्न नाहीय. धान्य मिळतेय पण ते एवढे महाग की घेऊ शकत नाहीत. पाकिस्तान सरकारही भेदभावाने वागत आहे. अनेक दशकांपासून पाकिस्तानच्या सरकारांनी त्यांच्याशी भेदभाव केला आणि त्यांच्या भूभागाचे शोषण केले, असा आरोप तेथील लोकांनी केला आहे.
सोशल मीडियावर निषेधाशी संबंधित अनेक व्हिडिओ समोर येत आहेत. यामध्ये गिलगिट-बाल्टिस्तान (जीबी) मधील लोक मोठ्या संख्येने रस्त्यावर निदर्शने करत आहेत. लडाखमधील कारगिल जिल्ह्यातील सक्करडू कारगिल रस्ता पुन्हा सुरू करावा, अशी लोकांची मागणी आहे. लडाखमध्ये राहणाऱ्या बाल्टिस्तानी लोकांना त्यांच्यासोबत एकत्र राहण्याची परवानगी द्यावी, अशी त्यांची मागणी आहे.
पाकिस्तान सरकारने आपल्या जमिनींवरील बेकायदेशीर कब्जा सोडावा, आपल्या भागातील नैसर्गिक संसाधनांचे होणारे शोषण थांबवावे, अशी मागणी करत आहेत. हागाईमुळे त्यांना गव्हासह सर्व जीवनावश्यक वस्तू खरेदी करणे शक्य होत नाही, त्यामुळे सरकारने त्यांना अनुदान द्यावे अशी मागणीही केली आहे.
पाकिस्तानी लष्कर गिलगिट-बाल्टिस्तानमधील गरीब भागातील जमीन आणि संसाधनांवर जबरदस्तीने कब्जा केल्याचा दावा करत आहे.