शहरं
Join us  
Trending Stories
1
हालचालींना वेग! बच्चू कडूंना महायुतीसह मविआकडूनही फोन; कोणाला पाठिंबा देणार?
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आधी अजित पवारांच्या मुख्यमंत्रि‍पदाचा बॅनर लावला, पण काहीवेळातच काढला, कारण काय?
3
Prakash Ambedkar: वंचित कोणाला पाठिंबा देणार?; निकालाच्या आदल्या दिवशीच प्रकाश आंबेडकरांनी जाहीर करून टाकलं!
4
अंबरनाथच्या उच्चभ्रू सोसायटीतील घटना; कुमारी मातेने इमारतीतून फेकले अर्भक
5
WhatsApp चं अप्रतिम फीचर! आता व्हॉईस नोट्स टेक्स्टमध्ये बदलता येणार; जाणून घ्या, कसं?
6
नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, दोघं ताब्यात; मोबाइलमध्ये आढळले आक्षेपार्ह चॅट
7
IPL 2025 कधीपासून सुरु होणार? BCCI ने पुढील ३ वर्षांच्या तारखा करून टाकल्या जाहीर
8
Wipro Bonus Shares : १४ व्यांदा बोनस शेअर देणार 'ही' दिग्गज कंपनी, ५ डिसेंबर पूर्वी रेकॉर्ड डेट
9
निकालांआधीच मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू; महायुती, मविआमधील या  नेत्यांची नावं चर्चेत
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मुख्यमंत्री मुंबईतच ठरणार', काँग्रेसच्या हायकमांडला संजय राऊतांचं आव्हान
11
Vikrant Massey : "ते टीव्ही स्टार्सला कमी लेखतात"; विक्रांत मेस्सीने इंडस्ट्रीतील मोठ्या स्टार्सची केली पोलखोल
12
१० मोठ्या मालमत्ताधारकांकडे ६०० कोटी रुपयांची थकबाकी; BMC ने दिला इशारा
13
IPL 2025: लिलावात 'या' भारतीय खेळाडूवर लागेल २५-३० कोटींची बोली; Mr. IPL ची भविष्यवाणी
14
धनुष-नयनतारा आमने सामने! ३ सेकंदाच्या व्हिडिओवरुन सुरु आहे वाद; एकाच रांगेत बसले अन्...
15
IND vs AUS : अवघ्या १५० धावांत टीम इंडिया All Out; पदार्पणात Nitish Reddy ची लक्षवेधी खेळी
16
या वीकेंडला OTT वर बघायला मिळेल सिनेमा अन् वेबसीरिजची मेजवानी! वाचा संपूर्ण यादी
17
जगातील सर्वात महाग कॉफी! महिन्याचा पगारही कमी पडेल, विकणारा आहे शेतकरी
18
कोण आहेत सागर अदानी? ज्यांच्यावर लाचखोरीचा झालाय आरोप; मिळालीये मोठी जबाबदारी
19
बंडूकाकांच्या उमेदवारीचा कोणाला लाभ?; मंत्र्यांच्या लढतीकडे जिल्ह्याचे लागले लक्ष
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : योगायोग! उद्या निकाल लागणार, त्याच वेळी पहाटेच्या शपथविधीला पाच वर्ष पूर्ण होणार

चाकांची बॅग आणाल, तर २३,००० रुपये दंड !

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 8:55 AM

तुम्ही कुठल्याही प्रवासाला जा, मग तो विमान प्रवास असो, ट्रेनचा असो किंवा बसचा, जवळपास प्रत्येकाकडे एक कॉमन गोष्ट दिसते, ती म्हणजे चाकांच्या बॅगा.

पर्यटनासाठी, बाहेरगावी जाण्याचं ठरलं की, आपण सर्वांत पहिली गोष्ट कोणती करतो? - तर चाकं असलेली बॅग आधी शोधतो. आपल्याकडे ती आधीच असेल तर ठीक आहे, नाहीतर आपल्या गरजेप्रमाणे, आवश्यकतेप्रमाणे त्या साइजची बॅग विकत घेतो, अगदीच शक्य नसेल तर कोणाची तरी मागून आणतो ! कारण काय, तर या बॅगा वजनाला अतिशय हलक्या, बऱ्यापैकी दणकट आणि मुख्य म्हणजे त्यात अगदी दाबून सामान भरल्यानंतरही, त्याचं वजन वाढल्यानंतरही हलवायला आणि हाताळायला अतिशय सोप्या. या बॅगला चाकं तर असतातच, शिवाय त्याला हँडल असल्यामुळे ही बॅग सहजपणे कुठेही नेता येते! अगदी लहान मुलंही ही बॅग सहजपणे हाताळू शकतात.त्यामुळेच तुम्ही कुठल्याही प्रवासाला जा, मग तो विमान प्रवास असो, ट्रेनचा असो किंवा बसचा, जवळपास प्रत्येकाकडे एक कॉमन गोष्ट दिसते, ती म्हणजे चाकांच्या बॅगा.

या बॅगांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्या इतक्या आकर्षक आणि स्टायलिश असतात, की पाहणाऱ्याची नजरच त्यावरून हटत नाही. शिवाय आजकालच्या बऱ्याच बॅगांमध्ये इनबिल्ट लॉकची सोय असते. नंबर फिरवले की झालं. त्यासाठी वेगळ्या लॉकची, साखळीची कुठलीही झंझट नाही. त्यामुळेच या बॅगांची खरेदीही प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. काही जण तर स्टाइल म्हणूनही ‘एअर बॅग’ खरेदी करतात. आपल्याकडे अनेकांना विशेषत: तरुणांना बुलेटची प्रचंड क्रेज असते. का? - तर ती आकर्षक, दणकट तर असतेच, पण इतर बाइक्सच्या तुलनेत तिचा स्पीडही जबरदस्त असतो, बुलेटवर बसलं की, एकदम मॅनली वाटतं ! हे तर झालंच, पण त्याहीपेक्षा अनेक जण बुलेटच्या फायरिंगचेही दिवाने असतात! या फायरिंगचा येणारा विशिष्ट आवाज अनेकांना खूप आवडतो.

केवळ फायरिंगसाठीही बुलेट घेणारे अनेक जण आहेत.  एअर बॅग्जच्या बाबतीतही हे काहीसं खरं आहे. डांबरी, सिमेंट काँक्रिट किंवा फरशांवरून या बॅगा नेताना त्यांच्या चाकांमुळे येणारा विशिष्ट खडखड आवाजही अनेकांना खूप भावतो. पण, युरोपातलं एक शहर आहे, ज्या शहराला या बॅगा, त्यांची चाकं आणि त्यातून येणाऱ्या खडखड आवाजालाच खूप मोठा आक्षेप आहे. क्रोएशिया या देशातील डुब्रॉवनिक हे ते शहर. त्यामुळे या शहरानं एअर बॅग्ज किंवा चाकांच्या बॅगांवरच बंदी घातली आहे. कोणीही या शहरात चाकांची बॅग घेऊन आत येऊ शकत नाही. समजा, कोणी आणलीच अशी बॅग आपल्या सोबत, तर त्यांना प्रत्येक बॅगमागे तब्बल २३ हजार रुपये दंड होऊ शकतो. पण, डुब्रॉवनिक या शहराच्या प्रशासनानं का करावा असा विचित्र नियम? त्यालाही एक कारण आहे आणि त्यामागे मोठी कहाणीही आहे.

डुब्रॉवनिक शहर अत्यंत सुंदर, आकर्षक आणि पुरातन शहर म्हणून संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. इथल्या इमारती, इथले रस्ते, इथल्या वस्तू, असं बरंच काही त्यांनी आपल्या मूळ रुपात जपलं आहे. आपल्याकडच्या कोणत्याच गोष्टींना त्यांनी ‘आधुनिक’ अवतारात येऊ दिलेलं नाही. त्यामुळे या शहराच्या मूळ सौंदर्याला आणखीच झळाळी आली आहे. म्हणूनच जगभरातून दरवर्षी अक्षरश: लाखो पर्यटक या शहराला भेट देतात. आता इतके पर्यटक, त्यांचं इतकं सामान म्हटल्यावर त्यांच्याकडे मुख्यत: एअर बॅग्ज किंवा चाकाच्या बॅगच असतात. कारण, त्यामुळे खूप मोठी सोय होते. पण, लोकांची हीच सोय डुब्रॉवनिकवासीयांसाठी मोठी कटकटही ठरली आहे. 

या शहरातले बहुतांश रस्ते, इतकंच काय, या शहरातल्या गल्लीबोळही दगडांपासून बनलेले आहेत. हे रस्ते शहराला प्राचीन, घरंदाज तर बनवतात, पण, या रस्त्यांवरून पर्यटक जेव्हा आपल्या बॅगा घसडत घेऊन जातात, तेव्हा त्याचा प्रचंड आवाज होतो. अगदी रात्री - बेरात्रीही पर्यटकांचा ओघ या शहरात सुरूच असतो. लोकं झोपलेली असताना मध्यरात्रीच्या या शांततेत तर हा आवाज अतिशय कर्णकटू भासायला लागतो. लोकांच्या झोपा त्यामुळे मोडायला लागल्या. त्याविरूद्ध लोकांनी अक्षरश: आंदोलनं उभारली. एकतर या बॅगा बंद करा, नाहीतर पर्यटकांना तरी बंदी घाला, म्हणून त्यांनी प्रशासनाला धारेवर धरलं. शेवटी प्रशासनाने आपल्या शहरात या बॅगांवर बंदी घातली.

‘रिस्पेक्ट द सिटी’ मोहीम ! लोकांच्या आग्रहाखातर शहराचे महापौर फ्रँकोविक यांनी शेवटी ‘रिस्पेक्ट द सिटी’ या मोहिमेंतर्गत नवी नियमावली लागू केली. त्यानुसार आता शहरात चाकं असणाऱ्या बॅगांना मनाई केली आहे आणि जो नियमभंग करेल त्याच्यावर दंड आकारणी सुरू झाली आहे. येत्या काही दिवसांत तर पर्यटकांच्या बॅगांना शहरात संपूर्णपणे बंदी असेल. शहराच्या बाहेरच या बॅगा जमा केल्या जातील. नियम अधिक कडक करण्यात येणार आहेत.

टॅग्स :World Trendingजगातील घडामोडीTravel Tipsट्रॅव्हल टिप्स