इस्लामाबाद : पाकिस्तान कर्जाच्या खाईमध्ये बुडालेला आहे. इम्रान खान जगाकडे मदतीची भीक मागत आहे. मात्र, कर्जाचा डोंगर आणि दहशतवादाला पोसल्यामुळे जगभरातील देशांनीही पाठ फिरविली आहे. जीडीपीच्या 100 पटींनी जास्त कर्ज असलेल्या पाकिस्तानच्या मुख्य धर्मगुरुने अजब सल्ला इम्रान खानला सुचविला आहे.
मौलाना खादिम हुसैन रिजवी यांनी खान यांना इस्लाम धर्माची आठवण करून दिली आहे. इस्लाममध्ये व्याज घेणे-देणे पाप आहे. यामुळे सरकारने ज्यांच्याकडून कर्ज घेतले आहे त्यांना व्याज मिळणार नसल्याचे सांगावे, असे सांगताना त्यांनी जगाला आव्हानही दिले आहे. ज्या देशांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करायची आहे, त्यांना सांगा की जेव्हा आमच्याकडे पैसे असतील तेव्हा देऊ, नाहीतर तुमच्यामध्ये दम असेल तर वसूल करून दाखवा, असे म्हटले.
पाकिस्तानवर जवळपास 92 अब्ज डॉलरचे कर्ज आहे. इम्रान खान सरकारने वर्षभरात जवळपास 16 अब्ज डॉलरचे कर्ज फेडले आहे. हा देश दिवाळखोर घोषित न करण्याचा प्रयत्न होता.
रिजवी याचा हा व्हिडीओ पाकिस्तानची पत्रकार नायला इनायत यांनी ट्विट केला होता. सोशल मिडीयावर हा व्हिडीओ कमालीचा व्हायरल झाला आहे. यामध्ये रिझवी पंजाबीमध्ये सांगतात की, देशावरील कर्जाचा डोंगर संपविण्याचा जालीम उपाय माझ्याकडे आहे. आणि हा उपाय मी मोफत देत आहे. साऱ्या जगाला सांगा, इस्लाममध्ये व्याज देणे पाप आहे. यामुळे तुम्ही निघा.आम्ही मूळ रक्कम परत करू, जेव्हा आमच्याकडे पैसे असतील तेव्हाच. ते जबरदस्ती करायला लागले तर सांगा काय करायचे ते करा. पहा एका मिनिटात कर्ज फिटले.