नवी दिल्ली - जगप्रसिद्ध सर्च इंजिन 'गुगल'वर सध्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान ट्रोल होत आहेत. गुगलवर दिसणारा इम्रान खान यांचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. गुगलवर भिकारी हा शब्द सर्च केल्यास चक्क पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा फोटो दिसत आहे. या फोटोत इम्रान यांची दाढी वाढलेली असून त्यांच्या हातात भिकेचा कटोरा दिसत आहे.
गुगलवर भिकारी शब्द सर्च केल्यास इम्रान खान यांचा मॉर्फ्ड केलेला फोटो दिसत आहे. विशेष म्हणजे, इम्रान यांच्या या फोटोला नेटीझन्सने चांगलंच ट्रोल केलं आहे. गुगलवर इम्रान यांचे अनेक फोटो दिसून येतात. मात्र, भिकारी या नावाने सर्च केल्यास, एका फोटो चक्क भिकारीच्या वेशातील दिसत आहे. त्यामुळे, भारतीय युजर्संकडून हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात येत असून पाकिस्तानची खिल्ली उडवली जात आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानच्या ट्विटर आणि फेसबुक युजर्संने याप्रकाराबद्दलही भारतालाच जबाबदार धरले आहे.
गुगलचे सीईओ सुंदर पिचई यांनीच जाणीवपूर्वक हा खोडसाळपणा केल्याचं पाकिस्तानी नेटीझन्सचे म्हणणं आहे. दरम्यान, भारताने जम्मू आणि काश्मीरमधील कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्तान सैरभैर झाला आहे. त्यामुळेच, इम्रान खान यांनीही भारतासोबतचे व्यापारी संबंध तोडले असून युद्धाची धमकीही भारताला दिली होती. याचा परिणाम पाकिस्तानमधील अर्थव्यवस्थेवर झाला असून तेथे महागाई वाढली आहे. तेथे सोन्याचे दर एक प्रति तोळा 87 हजार रुपयांवर पोहचले आहेत. तर, टोमॅटोची किंमत तब्बल 300 रुपये प्रतिकिलो एवढी झाली आहे. त्यामुळे पाकिस्तानला दिवाळखोरी लागली असून देश भिकारी झाल्याचं सांगत, नेटीझन्सकडून पाकिस्तानला ट्रोल करण्यात येत आहे.