शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

मुलाची अधिक काळजी घ्याल तर संकटात याल! मुलांमध्ये वाढते अधिक चिंता, नैराश्य, एकाकीपणा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 7:55 AM

आजकाल सध्या प्रत्येक पालक आपल्या मुलांची अपेक्षेपेक्षा अधिक काळजी घेत असल्याचे सर्रास पहायला मिळते.

न्यूयॉर्क :

आजकाल सध्या प्रत्येक पालक आपल्या मुलांची अपेक्षेपेक्षा अधिक काळजी घेत असल्याचे सर्रास पहायला मिळते. मात्र, सुरक्षित वातावरणामुळे मुलांमध्ये नैराश्य, एकाकीपणा, आत्महत्येचे प्रमाण वाढत असल्याचे धक्कादायक संशोधन समोर आले आहे. 

जगभरातील विद्यापीठ समुपदेशन केंद्रांच्या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणानुसार, विद्यापीठातील ५० टक्के विद्यार्थ्यांनी चिंतासंदर्भातील प्रश्नांसाठी आणि ४१ टक्के विद्यार्थ्यांनी नैराश्यासंदर्भात समुपदेशनाची मागणी केली. २०००च्या सुरुवातीपासून किशोरवयीन मुलांमध्ये नैराश्याचे प्रमाण वाढत आहे. त्यातून आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. जगभरातील अनेक मुले सध्या नैराश्याच्या गर्तेत अडकली आहेत.

किशोरवयीनमध्ये आत्महत्येचे प्रमाण वाढले२००० ते २०१५ दरम्यान अमेरिकेत आत्महत्या करून मरण पावलेल्या किशोरवयीन मुलींची संख्या जवळपास दुप्पट झाली. कॅनडात २००३ मध्ये १५-३० वयोगटातील २४ टक्के कॅनेडियन तरुणांनी नोंदवले की, त्यांचे मानसिक आरोग्य चांगले किंवा खराब आहे (अत्यंत चांगले किंवा उत्कृष्ट तुलनेत). २०१९ पर्यंत ही संख्या ४० टक्क्यांपर्यंत वाढली होती.

पालक का घाबरले?मानसशास्त्रज्ञ सुरक्षेवर दिलेला भर, हे एक कारण सांगतात. कॅनडातील गुन्हेगारीची लाट ६० आणि ८० च्या दरम्यान वेगाने वाढली. त्यामुळे पालक अधिकाधिक भयभीत आणि संरक्षणात्मक बनले. त्यातूनच अतिदक्षतेची समस्या सुरू होते. यामुळे मुलांना शिकण्यासाठी आणि वाढण्यासाठी आवश्यक असलेल्या अनुभवांपासून वंचित ठेवले गेले. 

अतिसुरक्षित मुलांना समस्या- चिंता, नैराश्य आणि गुन्हेगारीत ओढले जाणे.- समस्या हाताळण्यात असमर्थ.- मादक पदार्थांच्या आहारी जाणे.

शहरांमध्ये राहण्याचे आरोग्य फायदे होताहेत कमीनेचर या जर्नलमध्ये नुकत्याच प्रकाशित झालेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, २१ व्या शतकात, ग्रामीण भागातील मुले आणि किशोरवयीन मुलांच्या प्रगतीमध्ये वेगाने सुधारणा झाली. १५०० हून अधिक संशोधक आणि चिकित्सकांच्या जागतिक संघाने केलेल्या या संशोधनात १९९० ते २०२० पर्यंत २०० देशांतील शहरी आणि ग्रामीण भागातील ७१ दशलक्ष मुले आणि किशोरवयीन (५ ते १९ वर्षे वयोगटातील) मुलांच्या प्रगतीचे विश्लेषण करण्यात आले.