शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
2
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
3
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
4
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
6
ISRO-SpaceX ची भागीदारी यशस्वी, Elon Musk यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट; आता प्लेनपासून गावापर्यंत मिळेल नेट!
7
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
9
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
10
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
11
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
12
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
13
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन
14
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
15
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
16
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
17
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
18
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
19
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
20
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो

स्थलांतरितांचा आॅस्ट्रियामध्ये प्रवेश

By admin | Published: September 01, 2015 11:29 PM

हंगेरीमधून जर्मनीला जाणाऱ्या स्थलांतरितांनी रेल्वेचा वापर करुन आॅस्ट्रियामध्ये प्रवेश केला आहे. सोमवारी आॅस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नामध्ये ३,६५०

ब्युडापेस्ट : हंगेरीमधून जर्मनीला जाणाऱ्या स्थलांतरितांनी रेल्वेचा वापर करुन आॅस्ट्रियामध्ये प्रवेश केला आहे. सोमवारी आॅस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नामध्ये ३,६५० लोक येऊन पोहोचल्याची माहिती तेथील अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. आता हे लोक जर्मनीमध्ये म्युनिखच्या दिशेने जाण्याच्या तयारीमध्ये आहेत.मात्र त्यानंतर हंगेरीने कठोर धोरण अवलंबत राजधानी ब्युडापेस्टमधील केलेटी रेल्वे स्थानकावर स्थलांतरितांना रोखून धरले. त्यामुळे या स्थानकावर तणावाची स्थिती निर्माण झाली. हंगेरीच्या या भूमिकेवर युरोपातील विविध देशांनी नापसंतीही व्यक्त केली आहे. सर्बिया आणि हंगेरीच्यामध्ये असणाऱ्या सीमेवरती हंगेरीने तारेचे कुंपण आयत्यावेळेस घालण्याचा प्रयत्न केला त्याचप्रमाणे आधीच्या कुंपणाची दुरुस्तीही करण्याचा प्रयत्न केला मात्र स्थलांतरितांच्या लोढ्यांनी त्याला न जुमानता हंगेरीमध्ये प्रवेश केला आहे. आता यापुढे युरोपियन युनियन आणि हंगेरी या प्रश्नावर काय भूमिका घेते याकडे पाहणे अत्यंत महत्वाचे ठरणार आहे.मर्केल यांची भूमिका : ग्रीस प्रश्नापासून जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांनी आपल्या ठाम भूमिकेचा प्रत्यय प्रश्नाच्यावेळेस दिलेला आहे. ग्रीसच्या कर्जापेक्षा स्थलांतरितांचा येणारा ताण सर्वात जास्त त्रासदायक ठरणार आहे असे भाकित मर्केल यांनी यापुर्वीच वतर्विले होते. याप्रश्नावर बोलताना त्यांनी काल सांगितले, आता संपुर्ण युरोपने एक होऊन या प्रश्नाला सामोरे गेले पाहिजे. सर्व निर्वासितांचे वितरण योग्य प्रकारे सर्व देशांमध्ये झाले पाहिजे अशी त्यांनी भूमिका घेतली आहे. या वर्षभरामध्ये युरोपियन युनियनमध्ये अडीच लाख लोक आश्रयासाठी आलेले आहेत. सध्या बाल्कन देशांवर या स्थलांतरितांचा ताण आला असला तरी या नागरिकांचे मुख्य ध्येय जर्मनीला पोहोचण्याचेच आहे. जर्मनीमध्ये एकदा पोहोचल्यावर आपला रोजगाराचा व सुरक्षित जीवनाचा प्रश्न सुटेल असे त्यांना वाटते. जर्मनी देखिल गेल्या काही वर्षांमध्ये युरोपचे आर्थिक नेतृत्व करणारा देश झाला आहे. त्यामुळे साहजिकच सर्वाधीक संधी जर्मनीमध्ये उपलब्ध असल्यामुळे तेथे जाण्याची इच्छा या नागरिकांच्या मनामध्ये आहे. या वर्षभरामध्ये जर्मनीकडे दोन लाख लोकांनी आपल्याला आश्रय द्यावा अशी विनंती केली आहे.सध्या बाल्कन देशांवर या स्थलांतरितांचा ताण आला असला तरी या नागरिकांचे मुख्य ध्येय जर्मनीला पोहोचण्याचेच आहे. जर्मनीमध्ये एकदा पोहोचल्यावर आपला रोजगाराचा व सुरक्षित जीवनाचा प्रश्न सुटेल असे त्यांना वाटते. जर्मनी देखिल गेल्या काही वर्षांमध्ये युरोपचे आर्थिक नेतृत्व करणारा देश झाला आहे. त्यामुळे साहजिकच सर्वाधीक संधी जर्मनीमध्ये उपलब्ध असल्यामुळे तेथे जाण्याची इच्छा या नागरिकांच्या मनामध्ये आहे. या वर्षभरामध्ये जर्मनीकडे दोन लाख लोकांनी आपल्याला आश्रय द्यावा अशी विनंती केली आहे.