शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
5
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
6
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
7
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

मॅसिडोनियावर स्थलांतरितांचा ताण

By admin | Published: August 23, 2015 11:37 PM

सीरिया आणि इतर अनेक देशांमधून युरोपमध्ये घुसलेल्या स्थलांतरितांनी आता ग्रीस संपुर्ण देश पादाक्रांत करुन पुढे जाण्यास प्रारंभ केला आहे. सीरियन

स्कोजे : सीरिया आणि इतर अनेक देशांमधून युरोपमध्ये घुसलेल्या स्थलांतरितांनी आता ग्रीस संपुर्ण देश पादाक्रांत करुन पुढे जाण्यास प्रारंभ केला आहे. सीरियन स्थलांतरितांनी आता बाल्कन देशांमध्ये प्रवेश करण्याचा आटापिटा गेल्या दोन दिवसांमध्ये लावला आहे. ग्रीस पार करुन मॅसिडोनियामध्ये आता हे लोक पोडोचले आहेत. मात्र स्थलांतरितांच्या प्रश्नासाठी कोणतीच तयारी नसलेल्या मॅसिडोनियाची मात्र यामुळे चांगलीच भंबेरी उडाली. दररोज दोन हजार अशा गतीने स्थलांतरांचा लोंढा येऊ लागल्यावर मॅसिडोनियाने आणीबाणी परिस्थितीची घोषणा केली आहे.शुक्रवारपासून स्थलांतरित आणि मॅसिडोनियन पोलीस, लष्कराचे जवान यांच्यामध्ये नो मॅम्स लँडमध्ये धुमश्चक्री सुरु आहे. लहान मुले, महिला यांच्यासह घुसणाऱ्या या लोकांवर स्टन ग्रेनेड आणि अश्रूधुराचा वापरही पोलिसांनी करुन पाहिला पण तरिही त्यातूनही वाटा काढून स्थलांतरित घुसखोरी करतच आहेत. पावसाची रिपरिप, पिण्याचे पाणी व अन्नाचा तुटवडा असूनही चिखलात राहून सीरियन लोक मॅसिडोनियात घुसायची संधी शोधत आहे. मॅसिडोनियावर मात्र या अचानक आलेल्या प्रश्नाचा चांगलाच ताण आला आहे, त्यामुळे आणीबाणी घोषित करुन सरकारने लष्कराला पाचारण करण्याचा निर्णय घेतला आहे. मॅसिडोनियन सरकारने या सर्व गोंधळाच्या प्रश्नाचे खापर ग्रीसवर फोडले असून, ग्रीसने वेळीच लक्ष न दिल्यामुळे हे स्थलांतरित पुढे सरकले असा आरोप त्यांनी केला आहे. 1999 ची स्थिती कोसोवो हा तत्कालिन सर्बियाचा प्रांत असताना जी युद्धमय परिस्थिती झाली होती त्यावेळेस अल्बानियन वंशाच्या लोकांनी मॅसिडोनियाच्या उत्तर भागामध्ये आश्रय घेतला होता. तशीच काहीशी स्थिती आता या देशावर पुन्हा आली आहे मात्र या प्रश्नाचे गांभिर्य जास्त आहे हे निश्चित.आम्ही दहशतवादी नाही !मॅसिडोनियन सरकारने प्रतिकाराची भूमिका घेतल्यामुळे स्थलांतरितांची अगदीच ना घरका ना घाटका अशी स्थिती झाली आहे. आम्ही दहशतवादी नाही, आम्ही माणसेच आहोत अशी विनवणी हे सीरियन लोक करत आहेत. तर सीरियन लोकांमध्ये पाकिस्तानी, अफगाणी लोक घुसल्यामुळे स्थलांतरितांमध्येही गट पडले आहेत व वेगवेगळे राहून मॅसिडोनियात प्रवेश करण्याची धडपड ते करत आहेत. अपंग, गर्भवतींचाही समावेश या स्थलांतरितांच्या लोंढ्यामध्ये आहे.