शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

पाकिस्तानचं दिवाळं; एअर स्ट्राइकमुळे गुंतवणूकदार घाबरला, 'बाजार उठला'! 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2019 6:03 PM

भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राइकमुळे पाकिस्तानमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांचे धाबे दणाणले आहेत. भारताच्या या धडाकेबाज कारवाईमुळे पाकिस्तामध्ये दहशतीचे वातावरण आहे.

नवी दिल्ली - भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राइकमुळे पाकिस्तानमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांचे धाबे दणाणले आहेत. भारताच्या या धडाकेबाज कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये दहशतीचे वातावरण आहे. दरम्यान, भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तानमध्ये आर्थिक गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. त्यामुळे बुधवारी पाकिस्तानमधील शेअर बाजारामध्ये मोठी घसरण झाली. आज बाजार उघडताच कराची स्टॉक एक्स्चेंजचा निर्देशांक केएसई-100 काही मिनिटांमध्येच  एक हजार अंकांनी कोसळला.   पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने सीमा पार करून एअर सर्जिकल स्ट्राइक करत पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये असलेले दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. दरम्यान, भारताकडून अजून हल्ला होण्याच्या भीतीमुळे पाकिस्तानमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक काढून घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आज पाकिस्तानमधील शेअर बाजार उघडताच कराची स्टॉक एक्स्चेंजचा निर्देशांक   काही मिनिटांमध्येच  एक हजार अंकांनी कोसळला. त्यामुळे गुंतवणुकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती खूप कमकुवत झालेली आहे. अशा परिस्थितीत भारतासोबतचा तणाव वाढल्याने गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शेअर बाजारात घसरगुंडी सुरू आहे. गेल्या दोन दिवसांत कराची शेअर बाजारात दोन हजार अंकांची घसरण झाली आहे. 14 फेब्रुवारीपासून आतापर्यंत पाकिस्तानी शेअर बाजाराचे 6 टक्के नुकसान झाले आहे. पाकिस्तानी अर्थव्यवस्था सध्या चिंताजनक स्थितीत असून, परिस्थिती अशीच बिघडत राहिली तर कराची शेअर बाजारात अजून मोठी घसरण होऊ शकते असे, अर्थतज्ज्ञांनी सांगितले.  

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकPakistanपाकिस्तानStock Marketशेअर बाजारIndiaभारतsurgical strikeसर्जिकल स्ट्राइक