शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

Imran Khan Address to Nation: 'नवाज शरीफ आणि नरेंद्र मोदी यांच्यात गुप्तभेट', इम्रान खान यांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 9:45 PM

Imran Khan Address to Nation: ''येत्या रविवारी देशाचा निर्णय होईल, हा देश कोणत्या मार्गाने जाणार हे ठरवले जाईल. पण मी शेवटच्या चेंडूपर्यंत लढत राहीन. रविवारी निकाल काहीही येवो, मी पुन्हा नव्याने उभा राहून तुमच्यासमोर येईन.''

इस्लामाबाद:पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानसाठी उलटी गिनती सुरू झाली आहे. आज अविश्वास प्रस्तावावर चर्चा होण्यापूर्वीच संसदेचे कामकाज 3 एप्रिलपर्यंत तहकूब करण्यात आले. दरम्यान, इम्रान खान सातत्याने देशात आपल्या बाजूने वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज इम्रान खान यांनी देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी देशाला अस्थिर करण्यात अमेरिकेचा हात असल्याचा आरोप केला. तसेच, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत मोठा खुलासा केला. 

'देशासाठी काम करायचे आहे'आपल्या संबोधनात इम्रान खान म्हणाले की, ''मी राज्यशास्त्राचा विद्यार्थी होतो, म्हणून राजकारणात आलो. पाकिस्तानसाठी हा मोठा निर्णय घेण्याची वेळ आहे. इस्लामिक राज्य निर्माण करण्याचा आमचा उद्देश होता. न्याय याला माझ्या जाहीरनाम्यात सर्वोच्च स्थान होते. माझ्यासाठी न्याय आवश्यक नसता तर मी राजकारणात आलो नसतो. आज माझ्याकडे सर्वकाही आहे, यापूर्हीपण होते. मी गेल्या 25 वर्षापासून राजकारणात आहे. सुरुवातीला लोक माझ्यावर हसायचे, राजकारणात कशाला आलात, म्हणायचे. पण, मला देशासाठी काहीतरी करायचे होते, त्यामुळेच मी राजकारणात आलो.''

'नरेंद्र मोदी आणि नवाज शरीफ यांच्यात गुप्त भेट'ते पुढे म्हणाले की, ''बरखा दत्त यांनी आपल्या पुस्तकात लिहून ठेवले आहे की, नेपाळमध्ये नवाझ शरीफ भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुपचुप भेटायचे. लष्कराने कारवाई करू नये म्हणून मोदींसोबत बोलणी करायचे. आज तेच लोक मला काढून सत्तेत येण्याचा विचार करत आहेत. त्यांना फक्त सत्ता हवी आहे, त्यांच्या मनात देशाबद्दल कुठलीही भावना नाही. येत्या रविवारी देशाचा निर्णय होईल. हा देश कोणत्या मार्गाने जाणार हे ठरवले जाईल. पण मी शेवटच्या चेंडूपर्यंत लढत राहीन. रविवारी निकाल काहीही येवो, मी पुन्हा नव्याने उभा राहून तुमच्यासमोर येईन.''

'या कारस्थानात अमेरिकेचा हात'ते पुढे म्हणाले की, पाकिस्तानात आमची सत्ता असेल, तर सर्व संबंध तोडण्याचा इशारा अमेरिकेने दिला आहे. आमची सत्ता घालवण्यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत, पाकिस्तानला अस्थिर करण्यासाठी ज्या कारवाया सुरू आहेत, त्यामागे अमेरिकेचा हात आहे. पण मी राजीनामा देणार नाही, शेवटपर्यंत लढत राहीन. या रविवारी पाकिस्तान कोणत्या बाजूला असेल याचा निर्णय होणार आहे. रविवारी प्रत्येक गद्दाराचा चेहरा जनता लक्षात ठेवेल'', असेही इम्रान खान म्हणाले.

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानNarendra Modiनरेंद्र मोदीNawaz Sharifनवाज शरीफ