Imran Khan Arrest News : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पीटीआयचे अध्यक्ष इम्रान खान (Imran Khan) यांना तोशाखाना प्रकरणी कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. इस्लामाबाद पोलीस त्यांच्या अटकेचे वॉरंट घेऊन इम्रान यांच्या जमान पार्क येथील निवासस्थानी पोहोचले आहेत. इम्रान सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री राहिलेले चौधरी फवाद यांच्यासह अनेक नेते त्यांच्या निवासस्थानी उपस्थित आहेत. यादरम्यान इम्रान खान यांनी घराबाहेर येऊन आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी शहबाज शरीफ यांच्यावर जोरदार टीका केली.
मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या पाकिस्तानात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर तोशाखाना प्रकरणात अटकेची टांगती तलवार आहे. त्यांना आता कधीही अटक होऊ शकते, त्यामुळे आता त्यांनी पाकिस्तान सरकारविरोधात युद्ध पुकारले आहे.
आपल्या भाषणात इम्रान म्हणाले, 'ना मी कुणासमोर झुकलो ना तुम्हाला झुकू देणार. या चोर-डाकुंनी पाकिस्तानला कुठे नेऊन ठेवलंय. जो समाज गुलाम आहे तो कधीही स्पर्धा करू शकत नाही. केवळ स्वतंत्र समुदायच स्पर्धा करू शकतो. पाकिस्तान आपल्या इतिहासातील सर्वात मोठ्या महागाईत बुडाला आहे. जगासमोर आपल्या देशाचा अपमान होत आहे. भारतातील वाहिन्या बघा, तेही आपला अपमान करत आहेत, असं इम्रान म्हणाले.
blockquote class="twitter-tweet">
What future can a country have when crooks are thrust as rulers upon it? SS was about to be convicted by NAB for Rs 8 bn money laundering & by FIA for another Rs 16 bn corruption when he was rescued by Gen Bajwa who kept getting NAB cases trial postponed. While under trial he was
लाहोरमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करताना इम्रान खान यांनी शहबाज शरीफ यांना घोटाळेबाज, चोर, डाकू, दरोडेखोर म्हटले. त्याआधी त्यांनी ट्विट केले होते की, या देशाचे (पाकिस्तान) भविष्य काय असू शकते. शहबाज शरीफ यांना NAB कडून 8 अब्ज मनी लाँड्रिंग आणि FIA कडून 16 अब्ज रुपयांच्या भ्रष्टाचारात दोषी ठरवले जाणार होते, तेव्हा जनरल बाजवा यांनी त्यांना वाचवले.
इम्रान खान पुढे म्हणाले की, शहबाज शरीफ पंतप्रधान झाल्यानंतर लगेचच त्यांच्याविरुद्धच्या खटल्यांचा तपास करणार्या संस्थांचे प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. प्रथम एफआयए आणि आता एनएबी, जेणेकरुन ते स्वतंत्रपणे 16 अब्जांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करू शकतील आणि 8 मनी लाँडरिंगमधून स्वत: ला मुक्त करू शकतील, अशी टीका इम्रान खान यांनी केली.