ठळक मुद्देआता पुन्हा एकदा भारत आपल्यावर सर्जिकल स्ट्राइक करतो की काय, अशी भीती पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना वाटू लागली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कराच्या कारवाईनंतर पाकिस्तानविरोधात प्रॉक्सी युद्ध (सर्जिकल स्ट्राइक) सुरू होण्याची भीती आहे, असे ट्विट करत इम्रान खान यांनी भारतावर गंभीर आरोप केले आहेत.भारतामुळे दक्षिण आशियातील शांतता आणि सुरक्षा धोक्यात येण्यापूर्वीच आंतरराष्ट्रीय समुदायाने त्याकडे लक्ष देऊन कारवाई केली पाहिजे.
इस्लामाबाद: जम्मू-काश्मीरमधला दहशतवाद्यांचा म्होरक्या असलेल्या बुऱ्हान वणीची जागा घेणाऱ्या हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर रियाज नायकूचा भारतीय लष्करानं खात्मा केला आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा भारत आपल्यावर सर्जिकल स्ट्राइक करतो की काय, अशी भीती पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना वाटू लागली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कराच्या कारवाईनंतर पाकिस्तानविरोधात प्रॉक्सी युद्ध (सर्जिकल स्ट्राइक) सुरू होण्याची भीती आहे, असे ट्विट करत इम्रान खान यांनी भारतावर गंभीर आरोप केले आहेत.इम्रान खान यांनी ट्विटरवर लिहिलं आहे की, " भारतामुळे दक्षिण आशियातील शांतता आणि सुरक्षा धोक्यात येण्यापूर्वीच आंतरराष्ट्रीय समुदायाने त्याकडे लक्ष देऊन कारवाई केली पाहिजे. काश्मीरमध्ये अलीकडेच झालेल्या दहशतवादी हल्ल्यांना इम्रान खान यांनी स्थानिक घटना असल्याचं म्हटलं आहे. त्यात पाकिस्तानची कोणतीही भूमिका नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत असून, भारतात दहशतवाद्यांची घुसखोरी करत असल्याचा कांगावा पंतप्रधान नरेंद्र मोदी करतील. सीमेवरील दहशतवाद्यांचा मुद्दा उपस्थित करत भारत पाकिस्तानविरोधात सर्जिकल स्ट्राइकसारखी मोहीम राबवण्याच्या विचारात असल्याचाही आरोप इम्रान खान यांनी केला आहे. भारतानं कारवाई करण्यापूर्वी पाकिस्तान घाबरलाकाश्मीरमधील अशांततेमागे पाकिस्तानचा हात असल्याचं भारतानं वारंवार सांगितलं आहे. त्यावरून दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये शाब्दिक युद्धही रंगलं होतं. काश्मीरमधील हिंसा ही भारतातील स्थानिक समस्या आहे आणि त्याचा पाकिस्तानशी काहीही संबंध नाही, असा इम्रान खान यांचा दावा आहे. दक्षिण आशियातील शांतता धोक्यात आणणारी धोरणं भारतातले RSS आणि सत्ताधारी भाजपावाले राबवत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दुसरीकडे पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाजचे प्रमुख आणि विरोधी पक्षनेते शाहबाज शरीफ यांनीही भारतावर हल्लाबोल केला आहे. भारताकडून पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांचा छावण्या असल्याचा आरोप करणं म्हणजे एक प्रकारे पाकिस्तानविरुद्ध प्रचार करण्याचा भारताचा भाग आहे.”ऑपरेशन जॅकबूटद्वारे अनेक दहशतवाद्यांचा केला खात्माअसे म्हणतात की, जम्मू काश्मीरमध्ये NSA अजित डोवाल यांच्या नेतृत्वात दहशतवाद्यांविरुद्ध ऑपरेशन जॅकबूट चालवले जात आहे. चार वर्षांपूर्वी दक्षिण काश्मीरमधील पुलवामा, कुलगाम, अनंतनाग आणि शोपियान जिल्ह्यांना दहशतवाद्यांनी 'स्वतंत्र भाग' घोषित केले होते, त्यानंतर ही कारवाई सुरू करण्यात आली. बुऱ्हान वणीच्या गटात सबझार भट्ट, वसीम माला, नसीर पंडित, इश्फाक हमीद, तारिक पंडित, अफाकुल्लाह, आदिल खांडे, सद्दाम पद्दार, वसीम शाह आणि अनीस यांसारखे अनेक काश्मिरी तरुण होते. त्यापैकी बहुतेकांना ठार करण्यात आले आहे. या कारवाईत मारल्या जाणा-या दहशतवाद्यांच्या यादीमध्ये बुऱ्हानचे हे 10 सदस्यही सामील झाले होते.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
दुबईच्या धर्तीवर भारतातल्या विमानतळांचा होणार कायापालट; दिसणार असं चित्र
CoronaViurs: 'त्या' व्हायरल फोटोंवरून दिग्विजय सिंह अन् मुलावर ज्योतिरादित्य शिंदेंचा पलटवार
Coronavirus: आम्ही कोणत्याही युद्धासाठी तयार; चिनी सैन्याची अमेरिकेला थेट धमकी
Coronavirus: जगाची भारताकडे नजर; बुद्धांनी सांगितलेल्या चार मार्गांवरून देशाची वाटचाल- नरेंद्र मोदी
Coronavirus: कोरोना विषाणूवर मोठं संशोधन; पण खुलासा करण्याआधीच चिनी वैज्ञानिकाची गोळ्या घालून हत्या
CoronaVirus News: कोरोनाची लस जगाला देणार का?; भारताचा उल्लेख करुन इस्रायलचं लय भारी उत्तर
पाकिस्तानातून राजस्थानमार्गे भारतात येतंय नवं संकट; शेतकऱ्यांना सतावतेय चिंता