शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
3
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
4
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
5
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
7
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
8
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
9
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
10
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
11
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
12
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
13
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
14
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
15
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
16
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
17
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
18
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
19
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
20
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम

Imran Khan: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान अडचणीत; निवडणूक आयोगाने ठरवले अपात्र

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2022 6:26 PM

Imran Khan News : मुख्य निवडणूक आयुक्तांनी इम्रान खान यांना पाच वर्षांसाठी अपात्र ठरवले आहे.

Pakistan News:पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने (ECP) शुक्रवारी पीटीआयचे प्रमुख इम्रान खान यांना कलम 63 (1) (पी) अंतर्गत तोशाखाना संदर्भात खोटी घोषणा केल्याबद्दल पाच वर्षांसाठी अपात्र ठरवले आहे. घटनेच्या अनुच्छेद 63(1)(p) मध्ये असे म्हटले आहे की, एखादी व्यक्ती, "काही काळासाठी, मजलिस-ए-शुरा (संसद) किंवा प्रांतीय विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास अयोग्य आहे." त्यामुळे इम्रान यांची नॅशनल असेंब्लीच्या सदस्यपदावरून हकालपट्टी करण्यात आली असून आता त्यांच्या अपात्रतेमुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. लेखी निकालाची अद्याप प्रतीक्षा असली तरी, सध्याच्या नॅशनल असेंब्लीचा (एनए) कार्यकाळ संपेपर्यंत इम्रानला अपात्र ठरवल्याचे कायदेतज्ज्ञांचे मत आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) सिकंदर सुलतान राजा यांच्या नेतृत्वाखालील चार सदस्यीय खंडपीठाने इस्लामाबाद येथील ECP सचिवालयात हा निर्णय जाहीर केला. पाच सदस्यीय खंडपीठाने एकमताने हा निर्णय दिला. मात्र, आजच्या घोषणेसाठी पंजाबमधील सदस्य उपस्थित नव्हते. निकालानुसार, खोटे विधान केल्याबद्दल इम्रानवर फौजदारी कारवाई केली जाईल.

काय आहे प्रकरण ?ऑगस्टमध्ये, तोशाखाना भेटवस्तू आणि त्यांच्या कथित विक्रीतून मिळालेल्या पैशांचे तपशील सामायिक न केल्याबद्दल सरकारने इम्रानच्या विरोधात एक संदर्भ दाखल केला होता. पाकिस्तान डेमोक्रॅटिक मूव्हमेंट - सत्ताधारी आघाडीच्या खासदारांनी नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष राजा परवेझ अश्रफ यांच्याकडे हा संदर्भ सादर केला. त्यांनी तो पुढील कारवाईसाठी मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) सिकंदर सुलतान राजा यांच्याकडे पाठवला.

1974 मध्ये स्थापित, तोशाखाना हा मंत्रिमंडळ विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील एक विभाग आहे. सरकारे आणि राज्यांचे प्रमुख किंवा परदेशी मान्यवरांनी शासक, संसद सदस्य, नोकरशहा आणि अधिकारी यांना दिलेल्या मौल्यवान भेटवस्तू यात संग्रहित केल्या जातात. तोशाखाना नियमांनुसार, ज्या व्यक्तीला हे नियम लागू आहेत त्यांनी भेट/भेटवस्तू आणि अशा इतर सामग्रीबाबत कॅबिनेट विभागाकडे माहिती देणे आवश्यक आहे. पीटीआय सरकारमध्ये इम्रानने 2018 मध्ये पदभार स्वीकारल्यापासून त्यांना दिलेल्या भेटवस्तूंचा तपशील उघड करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप आहे.

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तान