रशियाने युक्रेनवर हल्ला केला आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान मॉस्कोमध्ये पोहोचले. यावेळचे त्यांचे वक्तव्य साऱ्यांना माहितीच असेल. परंतू त्यापेक्षा इम्रान खान आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या या फोटोची चर्चा जोरदार रंगली आहे. कारण त्यांच्यामध्ये असलेले टेबल आहे.
पुतीन आणि इम्रान खान यांच्यात एक टेबल ठेवण्यात आले होते. त्यावर एक पुष्पगुच्छ ठेवण्यात आला होता. बाकी काही विशेष नाही. परंतू त्या टेबलची साईज खूप महत्वाची होती. इतर देशांच्या प्रमुखांशी भेटताना पुतीने मोठ्या गोलाकार टेबलचा वापर करतात. एका बाजुला ते तर दुसऱ्या बाजुला पाहुण्या देशाचे प्रमुख असतात. परंतू पाकिस्तासोबत एकदम छोटे टेबल होते. या बदलाचे आता राजकीय अर्थ काढले जाऊ लागले आहेत. लोकांना आता हे पाकिस्तान आणि रशियाच्या वाढत चाललेल्या संबंधांचे प्रतिक वाटत आहे.
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअर मॅक्रो जेव्हा रशियाच्या दौऱ्यावर आले होते, तेव्हा पुतीन यांनी त्यांना त्याच मोठ्या टेबलवर बसविले होते. तेव्हा या लांबलचक टेबलची चर्चा झाली होती. हा फोटो देखील खूप व्हायरल झाला होता. तेव्हा दोन्ही देशांमध्ये वाढत चाललेले अंतर असे संबोधले गेले होते. जर खरेच असे असेल तर भारतासाठी ही धोक्य़ाची घंटा आहे, असेही अनेकांचे म्हणणे आहे.