इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दोषी ठरविल्यानंतर आणि अटक केल्यानंतर उच्च सुरक्षा असलेल्या अटक येथील तुरुंगात ठेवण्यात आले आहे. त्यांना ज्या कोठडीत ठेवण्यात आले आहे तिथे ढेकूण, माशा असून शौचालयही उघड्यावर आहे.
इम्रान खान यांचे वकील नईम हैदर पंजोठा यांनी सांगितले की, पीटीआय पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांना पंजाब प्रांतातील तुरुंगात सी-श्रेणीत ठेवण्यात आले आहे. त्यांना ज्या कोठडीत ठेवण्यात आले आहे तिथे ढेकूण आणि माशाही आहेत. पंजोठा यांनी सोमवारी कारागृहात इम्रान खान यांची भेट घेतल्यानंतर सांगितले की, माजी पंतप्रधानांना एका छोट्या खोलीत ठेवण्यात आले आहे. ज्यात उघडे शौचालय आहे.
वकिलांनी सांगितले की, खान यांना एका अंधाऱ्या खोलीत ठेवण्यात आले आहे. येथे माशा घोंघावत असतात. जणू काही ते अतिरेकी असल्यासारखे त्यांना वागवले जात आहे.
उर्वरित आयुष्य तुरुंगात घालविण्याची तयारीइम्रान खान यांनी म्हटले आहे की, ते आपले उर्वरित आयुष्य तुरुंगात घालविण्यासाठी तयार आहेत. पंजोठा म्हणाले की, खान यांनी त्यांना सांगितले की पोलिसांनी त्यांना अटक वॉरंट दाखविले नाही.